Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे रमेश भोगाडे यांना एलआयसीत उत्कृष्ट सेवा ‘बीड शाखा रत्न’ पुरस्कार

आष्टी (प्रतिनिधी) भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) बीड शाखेच्या कार्यक्षेत्रात विमा क्षेत्रात सातत्यपूर्ण, प्रामाणिक व विश्वासार्ह सेवा बजावल्याबद्दल विमा प्रतिनिधी आष्टीचे रमेश भोगाडे यांना ‘बीड शाखा रत्न’ या मानाच्या सन्मानाने गौरविण्यात आले.विमा सेवा, ग्राहक समाधान आणि विमा जनजागृतीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन एलआयसी बीड शाखेच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला.एलआयसी बीड शाखेत विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या रमेश भोगाडे यांनी विमा प्रचार, नव्या विमाधारकांची नोंदणी,पॉलिसी सेवा, विमा दावे निकाली काढणे तसेच विमा विषयक मार्गदर्शन या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे असंख्य विमा ग्राहकांना वेळेवर, पारदर्शक व विश्वासार्ह सेवा मिळाली असून, ग्राहकांचा एलआयसीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. विमा ग्राहकांचे समाधान आणि विश्वास हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरत आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयोजित सन्मान समारंभात रमेश भोगाडे यांना ‘बीड शाखा रत्न’ सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. हा सन्मान उदयजी सुदुंब्रेकर, विभागीय व्यवस्थापक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.कार्यक्रम नितीन मगर, शाखाधिकारी, गेवराई, गणेश औटी, शाखाधिकारी,संदीप जोशी, वरिष्ठ शाखाधिकारी, विकास अधिकारी शिवाजी पवार यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.हा पुरस्कार रमेश भोगाडे यांनी पत्नी आरती भोगाडे व भाऊ योगेश भोगाडे यांच्यासह स्वीकारला.कुटुंबीयांचा पाठिंबा, सहकारी विमा प्रतिनिधींचे सहकार्य तसेच विमा ग्राहकांचा विश्वास यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.हा सन्मान म्हणजे आपल्या कार्याची पावती असून, भविष्यातही विमा ग्राहकांना अधिक दर्जेदार, तत्पर व प्रामाणिक सेवा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.रमेश भोगाडे यांच्या या यशाबद्दल एलआयसी बीड शाखेतील अधिकारी, कर्मचारी, सहकारी विमा प्रतिनिधी,विमा ग्राहक, मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या