Ticker

6/recent/ticker-posts

राजेंद्र वाळके यांना मराठा सेवा संघाचा तानुबाई बिरजे, राज्यस्तरीय जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार जाहीर

आष्टी(प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील लोणी स. येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस फोटोग्राफार राजेंद्र वाळके यांना मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे,माँसाहेब जिजाऊ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सिताराम पोकळे यांनी दिली आहे. आष्टी तालुक्यातील लोणी स. येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सोमनाथ वाळके यांचे ज्येष्ठ बंधू राजेंद्र वाळके हे जवळपास २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या दैनिकासाठी फोटोग्राफार करत आहेत. रस्ते,पाणी, वीज या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाव्यात म्हणून वेळोवेळी सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून राजेंद्र हे आवाज उठवत असतात.गावातील सर्व धार्मिक, सामाजिक,परमार्थिक क्षेत्रामध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.शंभुराजे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय लोणी या शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविलेले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना वेळोवेळी सन्मानित केले आहे.,सय्यदमीर बाबा विद्यालय,सर्व जिल्हा परिषद वस्तीशाळा आणि गावांतील अमरधाम स्मशानभूमी,जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय ,दशक्रिया विधी स्थळ याठिकाणी अनेक वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना केली आहे. त्याचप्रमाणे आपल्या लेखनिद्वारे त्यांनी अनेक कविता तसेच वेगवेगळी तीन नाटके लिहिली आहेत. त्या नाटकांचे जवळपास १० प्रयोग सुद्धा ग्रामीण भागात झालेले आहेत.लोणी गावातील मंदिर,सभामंडप उभारणी साठी प्रयत्नशिल राहण्याबरोबरच रक्तदान शिबिराचे आयोजन, आरोग्य शिबीर परिसरातील सर्वच धार्मिक कार्यामध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. बीड जिल्ह्यातील वर्तमानपत्रातून अहील्यानगर जिल्हयातील अनेक वर्तमान पत्रांमधून त्यांनी पत्रकारिता केलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिर्जे,मॉसाहेब जिजाऊ पुरस्कार त्यांना परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सिताराम पोकळे यांनी जाहीर केला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मराठा सेवा संघाचे आष्टी तालुकाध्यक्ष तानाजी बापू जंजीरे,उपसभापती गोपाळ भाऊ रक्ताटे, रामदास महाराज रक्ताटे ह.भ.प.राऊतदादा, सरपंच बाजीराव वाळके,संजय धायगुडे,रामदास शेंडगे, ह.भ.प. नारायण महाराज वाळके, राजेंद्र गावडे, पं.स.सदस्य डॉ.सुभाष वाळके,पं.स.सदस्य प्रा.दादासाहेब झांजे,राहुल सुरवसे,शिवाजी पाटील, रमेश ढगे,हनुमंत थोरवे,महेबुब जवान,देविदासआबा धस,माजी आ.साहेबराव दरेकर,जयसिंग गव्हाणे,सरपंच सावता ससाणे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, शिरीषभाऊ थोरवे, बीड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष धैर्यशील थोरवे, अजीनाथ सासवडे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी आष्टी येथे आयोजित भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती परिषदेच्यावतीने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या