Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी संघर्ष,आव्हाने ही संधी म्हणून स्विकारले आणि इतिहास घडवला ...... सरपंच परिवंत गायकवाड

आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी दिशा देण्याचे श्रेय लोकनेते मुंडेसाहेबांना जाते.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी संघर्ष,आव्हाने ही संधी म्हणून स्विकारले आणि इतिहास घडवला असे प्रतिपादन कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सरपंच परिवंत गायकवाड यांनी क-हेवडगाव येथे बोलताना केले. भाजप नेते दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांची १२ डिसेंबर रोजी ७६ वी.जयंती लोकनेते आ.सुरेश ( अण्णा ) धस यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती साजरी क कऱ्हेवडगाव येथे सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमाने जयंती संपन्न झाली. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सरपंच परिवंत गायकवाड यांच्यावतीने कऱ्हेवडगाव येथे जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करून जयंती साजरी केली. यावेळी सरपंच परिवंत गायकवाड, कांतिलाल सांगळे, बळीराम खाडवे, हानुमान गायकवाड, अमर शेख, महेश सांगळे,गणेश टकले, आत्माराम नागरगोजे,उत्तम नागरगोजे, हरी टकले,कृष्णा जाधव,लतिका शेख,शरद खांडवे, जालिंदर खाडवे भगवान सांगळे, जालीधर नागरगोजे, केशवराव बांगर, बंडू बांगर,सलवार शेख, किरण गायकवाड, शिक्षक वाघमारे, पवार सर,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा समतावादी चळवळीचा आणि न्याय संघर्षाचा उज्ज्वल इतिहास आहे.म.फुले,राजर्षि शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे त्यांनी वंचित आणि बहिष्कृत समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी विचार तर दिलाच शिवाय लोकचळवळही चालविल्या.लोकनेते मुंडेसाहेबांनी जनसेवेसाठीच संपुर्ण आयुष्य खर्च केले.अभ्यासु आणि जनतेशी नाळ जुळलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे होते.सायकल,बैलगाडी आणि पायी प्रवास करून गाव वाड्यावर त्या आणि तांडयावर मुक्काम करत सर्वसामान्य गोरगरिबांच्या हृदयास स्थान निर्माण केलेले गाव,तालुका, जिल्हा,राज्य आणि देशपातळीवरचे राष्ट्रीय नेते स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य म्हणजे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यापीठासमान होते.त्यांचे अकाली जाणे म्हणजे अक्षरशः भर दुपारी अत्यंत कडक उन्हात सूर्य मावळत्यासारखे आहे.माणुसकी हे तत्व गोपिनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यभर जपले.दुर्दैवाने त्यांचे झालेले अकाली निधन हे तमाम महाराष्ट्र आणि हिंदुस्तानच्या दृष्टीने आणि विशेषतः मराठवाडा आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे असे सांगीतले. जन्मदिनाच्या निमित्ताने बीड जिल्ह्याच्या प्रत्येक मनुष्याच्या अंतर्मनात त्यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी इतिहास आजच्या राजकारणी,नेते, युवकांना प्रेरणा आणि बोध घेण्यासारखा आहे. माणुसकी जतन करण्याबरोबर राजकारणातील अत्यंत पवित्र नाते जपण्याचा भाग आहे.मुंडेसाहेब बीड जिल्ह्याचा आत्मा होते.मराठवाड्याचा बुलंद आवाज;तर महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ आणि हिंदुस्तानचे लोकप्रिय नेते होते असेही परीवंत गायकवाड म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या