Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य हिमालयाएवढे होते ---- माजी आ.भीमराव धोंडे ............ गोपीनाथगड येथे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त समाधीचे दर्शन घेत नतमस्तक

उत्तम बोडखे - गोपीनाथगड -------------- आपल्या आयुष्यभर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी प्रचंड कष्ट,परिश्रम,त्याग, मेहनत घेऊन जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्न सोडवण्या सोबतच दुःखावर फुंकर घालण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने राजकारणातील विद्यापीठ ठरलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य हिमालयएवढे होते असे प्रतिपादन आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भीमराव धोंडे यांनी केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज शुक्रवारी परळी वै. तालुक्यातील श्रीक्षेत्र गोपीनाथगड येथील मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन मुंडेसाहेबांच्या प्रतिमेसमोर विनम्र अभिवादन करून त्यांच्या प्रचंड कार्यकर्तृत्वाला अत्यंत दुःखद करणारे अनेक आठवणींनी उजाळा दिला. यावेळी त्यांच्या समवेत पाटोदा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुवर्णाताई लांबरुड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, माणिकराव खेडकर, रामराव खेडकर, वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, अभियंता एम.एन. बडे यांच्यासह असंख्य मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.माजी आमदार भीमराव धोंडे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे हे राजकारण, समाजकारण याच्याही पुढे जाऊन माणुसकी जिवंत ठेवणारे केंद्रस्थान होते. त्यांनी आपल्या आयुष्यात जात, धर्मपंथ न पाहता माणुसकीची मूल्य जपली म्हणूनच गाव, वाड्यावर त्यासह शहर जिल्हा आणि महानगरामध्ये कानाकोपऱ्यात मुंडेसाहेबांना मानणारा वर्ग तयार झाला. याच अफाट लोकप्रियतेमुळे मुंडेसाहेबांना जनतेने लोकनेता ही पदवी दिली.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी धोंडे परिवारावर प्रचंड विश्वास आणि प्रेम केले प्रत्येक सुखदुःखात ते सोबत राहिले आणि मार्गदर्शन करत राहिले. त्यांच्याविषयी निष्ठा ठेवून परिवाराने कायम पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांच्यासोबत राहण्याचा सातत्याने प्रयत्न केला.आजही दोन्ही घराण्याचे संबंध स्नेह आणि आदराचे आहेत असेही धोंडे म्हणाले. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री ना. पंकजाताई मुंडे,माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे आणि परिवारासोबत त्यांनी स्नेहपूर्वक दुःखद अंतकरणाने संवाद साधत आठवणींच्या काहुरामध्ये आधार देण्याचे ही काम केले.आज गोपीनाथराव मुंडे यांची जयंती महाराष्ट्र राज्यसह देशाच्या अनेक राज्यातील कानाकोपऱ्यात त्यांच्यावर प्रेम करणारे आणि विचार कार्याची सदैव सोबत राहिलेले कार्यकर्ते विनम्र नतमस्तक होत त्यांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करत आहेत. चौकट -------- ...असा मोठ्या मनाचा राजकारणी होणे नाही!
------------------ लोकनेते गोपीनाथराव मुंडे म्हणजे राजकारण, समाजकारण, संस्कृती यासह अनेक क्षेत्रातील चालते बोलते विद्यापीठ होते.त्यांच्या सहवास आणि मार्गदर्शनातून राज्य आणि देशभरात हजारो लाखो कार्यकर्ते घडले.मोठे मोठे पदावर गेले.अध्यात्म तसेच धार्मिक क्षेत्रामध्ये आणि सर्वसामान्य गोरगरिबांची सेवा करण्यात आणि बहुजनांना न्याय देण्यात त्यांनी आयुष्य समर्पित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या