
आष्टी (प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
यांच्या वतीने करण्यात आलेल्या प्रशासकीय व शैक्षणिक अंकेक्षण तपासणी अहवालात
अॅड.बी.डी.हंबर्डे आष्टी या महाविद्यालयास अ+ ग्रेड प्राप्त महाविद्यालय म्हणून
मान्यता मिळाली आहे.ही उपलब्धी ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचा
विश्वासार्ह आणि प्रेरणादायी मानक म्हणून ओळखली जात आहे.विद्यापीठाच्या तज्ज्ञ
समितीने महाविद्यालयातील अध्यापन–अध्ययन प्रक्रिया, अभ्यासक्रम अंमलबजावणी, संशोधन
व नवोन्मेष, विद्यार्थी प्रगती,प्रशासनातील पारदर्शकता,आर्थिक शिस्त, पायाभूत
सुविधा, समाजाभिमुख व विस्तार उपक्रम यांचा सखोल व सर्वंकष आढावा घेतला.या तपासणीत
महाविद्यालयाची विद्यार्थीकेंद्रित दृष्टी, सातत्यपूर्ण गुणवत्ता सुधारणा आणि
प्रभावी अंतर्गत गुणवत्ता हमी प्रणाली यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.या
यशामागे संस्थेचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे,उपाध्यक्ष दिलीपशेठ वर्धमाने,सचिव
अतूलशेठ मेहेर,सहसचिव सुलभा हंबर्डे,कोषाध्यक्ष डॉ. गणेश पिसाळ, संचालक मंडळातील
महेश चौरे,सुभान पठाण, प्रा.विश्वनाथ शिंदे,डॉ. प्रताप गायकवाड,श्रीमती रत्नमाला
हंबर्डे व तय्यब शेख यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांच्या नेतृत्वाखाली उपप्राचार्य
डॉ. बाबासाहेब मुटकुळे व अविनाश कंदले,पर्यवेक्षक अशोक भोगाडे,नॅक समन्वयक निवृत्ती
नानवटे, प्रसासकीय अधिकारी श्रीमती सरस्वती जाधव यांच्या समन्वयातून सर्व
प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी वर्गाने अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध व
समर्पितपणे कार्य केले. या सामूहिक प्रयत्नांचे फलित म्हणजे आज मिळालेला अ+ ग्रेड
होय.AAA अंतर्गत प्राप्त झालेले हे मानांकन महाविद्यालयाच्या शैक्षणिक
विश्वासार्हतेला नवा आयाम देणारे आहे.विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, संशोधनाच्या
संधी आणि स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त
ठरणार आहे. भविष्यातील नॅक मूल्यांकन,संशोधन प्रकल्प, नवोन्मेष उपक्रम आणि
आंतरसंस्थात्मक सहकार्यांसाठीही हे यश मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात
येत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालय परिवारावर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा
वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या