Ticker

6/recent/ticker-posts

बेलगावच्या रेणुकाई देवीचा ४ डिसेंबर रोजी यात्राउत्सव, शुक्रवारी कुस्त्यांचा हंगामा..

विशेष लेख ---------+ उत्तम बोडखे, आष्टी. ---------------- आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील श्री रेणुकाई देवी यात्रा उत्सवास दत्तजयंतीपासून प्रारंभ होत आहे.हा उत्सव तीन चालतो या यात्रा उत्सवात गुरुवार दि.४ डिसेंबर रोजी संध्याकाळी रेणुकाई देवीची पालखी मिरवणूक (छबीना) मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.शुक्रवार दि.५ डिसेंबर रोजी कुस्त्यांचा भव्य आखाडा होणार आहे.बेलगांव ग्रामस्थ दरवर्षी रेणुकाई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भाविक भक्त,मल्ल या भव्य कुस्ती हंगामाला हजेरी लावतात. ग्रामस्थांकडून देवीच्या परिसरात निसर्गरम्य वातावरणात दरवर्षी ही यात्रा भरवली जाते.याञेनिमित्त भाविकभक्तांनी रेणुकादेवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच,उपसरपंच, ट्रस्ट अध्यक्ष,ग्रामपंचायत सदस्य,बेलगाव ग्रामस्थ व रेणुकाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. गुरुवार दि.४ डिसेंबर रोजी संध्याकाळी कोमल पाटोळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे. महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुकामाता.माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता,दत्तात्रेय, अनुसयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा हा माहूरचा डोंगरकिल्ला.तिचेच उपपीठ म्हणून बेलगावच्या रेणुकाई देवीचे ओळख आहे. दरवर्षी पायी माहूरला जाणाऱ्या आपल्या भक्ताच्या पाठीमागे शेळीच्या रुपात माहूरची रेणुकामाता येऊन बेलगांव या गावी प्रकट झाली अशी जुनी आख्यायिका आहे.बेलगाव व परिसरातील भाविकांची ही कुलदेवता आहे.बेलगांवचे ग्रामस्थ मोठ्या श्रद्धाभावाने रेणुकाई मातेची मनोभावे सेवा करतात.रेणुकाई देवीला यात्रा व नवरात्रोत्सवाला विशेष साज,श्रृंगार चढवला जातो. सोन्याचे दागिणे आणि अलंकार देवीला चढविले जातात. दागीण्यांनी सजलेल्या रेणुका देवीचं नयन मनोहरी रुप प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्यासारखे असते. आष्टी शहरापासून १० कि.मी.अंतरावर बेलगाव हे गाव वसलेले आहे.त्या गावचे जागृत देवस्थान माहूरगडचे उपस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणुकाईमातेचे पुरातन काळातील दगडी कोरीव केलेले मंदिर असून हे मंदिर बोकडी नदीच्या काठावर टेकडीवर असून नयनरम्य वातावरणात देवीचे मंदिर आहे.हा परिसर भाविक व पर्यटकांना आकर्षित करणारा आहे.बेलगाव आणि परिसरात रेणुकामातादेवीचे महात्म आहे.संपूर्ण पंचक्रोशीत ही देवी नवसाला पावते म्हणून तिची ख्याती आहे.मोठ्या भक्तिभावाने बेलगांव ग्रामस्थ नवरात्र उत्सवात विधिवत पुजाअर्चा करून घटस्थापना करून ९ दिवस देवीचा जागर करतात.निसर्गरम्य वातावरणात असलेले देवीचे मंदिर हे राज्यातील कानाकोपऱ्यातुन व आष्टी तालुक्यातील भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. रेणुकामातेचे महात्म्य पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.दरवर्षी बेलगाव येथील तरुण श्री क्षेत्र माहूरगड ते बेलगाव ५०० कि. मी.चे अंतर पायी चालत देवीची ज्योत घेऊन येतात. ही ज्योत माहूरगड ते बेलगाव पायी चालत घेऊन येतात.ही परंपरा कायम आहे.यामध्ये २०० तरुण सहभागी होतात.बेलगाव ग्रामस्थ नवरात्रात ९ दिवस मोठ्या श्रद्धेभावाने नवरात्र महोत्सव साजरा करतात. ९ दिवस विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम घेऊन नवरात्रीत नवदुर्गाचा जागर घालून शारदीय नवरात्र महोत्सव दिवसभर विविध कार्यक्रम व रात्री हरीकिर्तन असे दैनंदिन कार्यक्रम असतात.शेवटच्या दिवशी नवरात्रोत्सवाची महाप्रसादाने सांगता होते.मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तजयंतीच्या दिवशी रेणुकाई मातेची यात्रा बेलगांव ग्रामस्थ मोठया उत्साहात साजरा करतात.तीन दिवस हा यात्रा महोत्सव चालतो. पहिल्या दिवशी विधीवत पौर्णिमेदिवशी देवीची पालखी छबिना मिरवणूक,दुसऱ्या दिवशी भव्य मल्लाचा हंगाम भरला जातो.हा हंगाम व यात्रा बेलगाव परिसरातील अठेगावपुठ्यात प्रसिध्द आहे.तिसऱ्या दिवशी हीच यात्रा गावात भरते.यात्रेच्या दरम्यान देवीचा परिसर भाविक भक्तांच्या गर्दीने गजबजून केलेला असतो.श्री रेणुकाई देवी देवस्थान ट्रस्टला महाराष्ट्र शासनाचा "क"दर्जा प्राप्त झाला आहे.भक्तनिवास, मंदिर परिसर सुशोभीकरण आदी विविध विकास कामे या ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर परिसरात सुरु आहेत. उत्तम बोडखे, आष्टी.. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या