
आष्टी (प्रतिनिधी )
पत्रकारिता हा लोकशाही व्यवस्थेतील चौथा आधारस्तंभ म्हणून
महत्त्वाची भूमिका निभावत असतो. या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक दशकापासून अत्यंत
प्रभावीपणे आणि कार्यक्षम पत्रकारिता करणारे उत्तमराव बोडखे यांचे योगदान मौलिक
असेच आहे असे कौतुक इंडिया बँकेचे व्यवस्थापक राकेश शाही यांनी केले. आष्टी येथे आज
मंगळवारी इंडिया बँकेचे व्यवस्थापक राकेश शाही यांनी वरिष्ठ पत्रकार तथा दैनिक
झुंजारनेताचे उपसंपादक उत्तमराव बोडखे यांना लेखन विषयक विशेष डायरी सस्नेह भेट
देऊन त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील आजपर्यंतच्या कार्यपूर्तीबद्दल अभिनंदन ही
केले.पत्रकार उत्तम बोडखे हे पत्रकारिता क्षेत्रातील एक आढळ स्थान आहे.
सकारात्मक,परिवर्तनवादी आणि सर्व घटकांना न्याय देणारी प्रेरणादायी बातमी हा
त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. म्हणूनच आजपर्यंतच्या कालावधीत
त्यांना शासन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मान
झालेला आहे.आज इंडिया बँकेचे व्यवस्थापक राकेश साई यांनी त्यांच्या या कर्तव्य
सेवेच्या कौतुक करत त्यांना विशेष डायरी सस्नेह भेट दिली आणि भविष्यातील त्यांच्या
सामाजिक बांधिलकीच्या योगदानाला शुभेच्छा दिल्या. चौकट -------- बँकांनी
सर्वसामान्यांचा आदर करावा! ---------------- बँका या शेतकरी कामगार नोकरदार
यांच्यासह उद्योगपती आणि व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे योगदान देतात परंतु अनेक वेळा
सर्वसामान्यांना योग्य वागणूक भेटत नाही.यावर बोट ठेवत वरिष्ठ पत्रकार उत्तमराव
बोडखे यांनी बँक अधिकाऱ्यांनी एक न्यायिक भूमिका ठेवत सर्वसामान्य ग्राहकांना ही
चांगली वागणूक देऊन सेवाभाव जपावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली.
0 टिप्पण्या