
आष्टी ( प्रतिनिधी )
आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी पवित्र भूमीमध्ये
जोगेश्वरी देवीच्या नावाने आम्ही तत्कालीन कार्यकर्त्याच्या मागणीनुसार जोगेश्वरी
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले ही शाळा नावारुपाला आणण्यासाठी सुधाकर
कुलकर्णी यांच्यासह आजपर्यंत या शाळेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना व
परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थांना जाते. सलग एकाच गावात ३७ वर्ष मुख्याध्यापक
पदावर राहून आदर्श विद्यार्थी घडवणारे सुधाकर कुलकर्णी असल्याचे प्रतिपादन शेतकरी
शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले. पारगाव
(जो.) येथील जोगेश्वरी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर कुलकर्णी यांच्या
सेवापूर्ती सोहळ्यामध्ये ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या कार्यक्रमास ह.भ.प.अशोक
महाराज भोसले, ह.भ.प.अश्रू महाराज मोकाशे, अमोलराजे शिंदे, संभाजी जगताप, दादासाहेब
जगताप, माजी सरपंच तात्यासाहेब कदम, माजी सरपंच गणेश मोकाशे,निळूकाका
खेडकर,सावळेराम बळे,सखारामआबा बळे,कुंडलिक मोकाशे,इकबाल शेख,पत्रकार भीमराव गुरव,
आण्णासाहेब भोपळे,जोगेश्वरी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अर्जुन खेडकर सर,मोरे
सर,जोगेश्वरी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ,पालक व कर्मचारी विद्यार्थी,
मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार भीमराव धोंडे पुढे बोलताना
म्हणाले की, कुलकर्णी हे या गावात नेमणूक झाल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत
मुख्याध्यापकपदी राहिले आहेत. अंत्यत चांगली शैक्षणिक सेवा दिली आहे. तालुक्यांत
सात आठ वारकरी शाळा आहेत.आता आपणही आष्टी येथील माऊली मंदिरामध्ये वारकरी शिक्षण
संस्था सुरू करीत आहोत.या संस्थेतून इंग्रजी व मराठी भाषेतून वारकरी संप्रदायाचे
शिक्षण दिले जाणार आहे. पारगाव भागातील लोकांजवळ माणुसकी आहे. पारगाव जोगेश्वरी
विद्यालयात पारधी, भिल्ल,अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन
सरकारी नोकरी करत आहेत. आपण आयुष्यात कधीच गुत्तेदारी केलेली नाही.आष्टी
तालुक्यातील ७० टक्के विद्यार्थी आमच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतात.दुष्काळी
तालुक्यातील मुलांनी इंजिनिअर, डॉक्टर, वकील या शिक्षणाकडे आकर्षित व्हावे असे
सांगत कडा ते रूई मी शाळा रोज पायी केली.पुढे आमदार झालेवर मी पहीली शाळा माझे
जन्मगाव रुई येथे सुरू केली.माझ्या मालकीची १०० एकर जागा मी शिक्षण संस्थेला दिली
आहे.वयोवृद्ध व्यक्तीनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.अहार व्यवस्थितरित्या घ्यावा
सेवानिवृत्ती नंतर शाळेकडे लक्ष ठेवावे असे आवाहन केले. मुख्याध्यापक सुधाकर
कुलकर्णी बोलताना म्हणाले की,पारगावची शाळा १९८८ साली सुरू झाली आहे. १९८२ साली
शिक्षण संस्थेची स्थापना झाली. आता १०० युनिट्स या संस्थे अंतर्गत सुरू आहेत.
शिक्षणाची गंगा वहाते आहे. पारगावच्या दरवर्षी चार ते पाच विद्यार्थी विशेष
प्राविण्य मिळवतात. आतापर्यंत ६२५ विद्यार्थी उच्चशिक्षीत झाले आहेत.दहावी व बारावी
१०० टक्के निकाल आहे. बहुताश शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पारगावच्या
शाळेवर धोंडे साहेबांनी विशेष महत्त्व देऊन लक्ष ठेवले आहे. पालकांनी आपल्या
मुलांना या शाळेतच शिकवावे बाहेरच्या शाळेत पाठवू नये असे सांगितले. ह.भ.प.अशोक बळे
महाराज म्हणाले की,विद्यार्थीचे आई वडील व शिक्षकच खरे गुरु असतात या शाळेचा एकमेव
विद्यार्थी महाराज होऊन धार्मिक संस्कार घेऊन विद्याभूषित झालोय. सुधाकर कुलकर्णी
यांनी शिक्षक म्हणून निष्कलंक सेवा केली आहे.धोंडे साहेब वारकरी शिक्षण इंग्रजी
भाषेत सुरू होणार आहे या उपक्रमांचे मी स्वागत करतो असे सांगितले. या कार्यक्रमास
शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार
अधिकारी,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, राजकीय, सामाजिक,धार्मिक
क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी शिक्षण संस्था व भगिनी शिक्षण संस्थेचे सर्व प्रशासकीय
अधिकारी,आजी- माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक मान्यवर
ग्रामस्थ,शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद जोगेश्वरी माध्य.व उच्च
माध्य. विद्यालयातील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
-------------------
0 टिप्पण्या