Ticker

6/recent/ticker-posts

संत तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडणारे कीर्तनकार ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगावकर

आष्टी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनीच या राज्याला भक्तीचा मार्ग दाखवला. लोकसंगीत ही त्या प्रदेशाची ओळख असते किंबहुना वारकरी संप्रदायातून आपल्या जीवनाला एक सुसंगत आकार देऊन हजारो लाखो लोकांच्या जीवनाला वारकरी संप्रदायाचा सुगंध देऊन नवा तेजोमय प्रकाश पाडणारे कीर्तनकार म्हणून हरिभक्ती परायण डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांच्या कार्यकर्तृत्वाला आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य भक्त धन्यवाद देत आहेत. 1978 ते 1981 या काळामध्ये आळंदी मध्ये वारकरी संप्रदायाच्या अत्यंत प्रामाणिकपणे शिक्षण ह.भ.प. पानेगावकर महाराजांनी घेतले. 1991 ते 92 या काळामध्ये ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र पैठण येथे विश्वशांतीचे कराड साहेब यांचे त्यांना दर्शन झाले.२००३ ला ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी उत्सव सोहळ्यामध्ये अर्थात 2004 मध्ये दरमहा एकादशीनिमित्त महाराजांची किर्तन सेवा ही सुरू झाली. कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातून भक्तीचा मार्ग दाखवताना त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलाच; पण आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातही त्यांनी विश्वशांतीचा प्रचार आणि प्रसार अत्यंत जोमाने आणि निष्ठेने पार केला. माऊली श्री तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञान त्यांनी जगासमोर मांडले काळ सार्थक केला आम्ही हे वाक्य त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अत्यंत साजेसे आणि शोभून दिसते आहे! संतांचं मागून खावं; पण दुष्टांनी दिलेलं ही खाऊ नये असे विचार मांडणारे महाराज संसारमायेतून बाहेर निघाल्यासच भक्ती मार्गाची गोडी निर्माण होते या अनुषंगाने सेवार्थ असतात.. माळकरी,वारकरी आणि कष्टकऱ्यांच्या घरचं खावं.वारी हा महाराजांचा अत्यंत आवडीचा विषय आहे.त्यांनी वारी ‌या विषयावर झी टॉकीज या मराठी वाहिनीवर विस्तृत विवेचन केलेले आहे. महाराष्ट्रातील लाखो रसिक प्रेक्षक आणि भाविक भक्तांनी त्यांचे हे मौलिक ज्ञान ग्रहण केले आहे.अस्खलित शब्दांचा प्रतिभाषाली अविष्कार म्हणजेच ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगावकर आहेत. चौकट -------- रौप्यमहोत्सवी वर्ष भाविकांची अलोट गर्दी! --------------------------- विश्व शांती केंद्र आळंदी चा 25 रौप्यमहोत्सवी वर्ष सोहळा संपन्न होत आहे.गेली 25 वर्षे डॉ सुदाम पानेगावकर महाराज यांची कीर्तन सेवा अद्याप अखंड चालू आहे.किमान 2 लाख लोक उपस्थित राहत असून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेत. विश्वशांती केंद्राच्या कृपेची जाणीव! ---------------------- देशासह जगाला शांतीचा संदेश देणारे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात भारत देशाचे शांतीच्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणारे गुरुदेव श्री विश्वनाथ कराड आणि विश्वशांती केंद्र यांनी दिलेले प्रेम याची पूर्ण जाणीव असल्याची विनम्र प्रतिक्रिया ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या