Ticker

6/recent/ticker-posts

मुख्याध्यापक साईनाथ बोडखे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव 'आदर्श शिक्षक' पुरस्कार प्रदान ............ सिने अभिनेत्री चित्रा दिक्षित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राठोड यांच्या हस्ते झाला सन्मान

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील सुदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदवाडी सराटेवडगावचे सुपुत्र साईनाथ बोडखे सर यांना नुकताच लोकशक्तीच्या वतीने ‘लोकशक्ती महाराष्ट्र गौरव 'आदर्श शिक्षक' हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित आले. सिनेअभिनेत्री चित्रा दिक्षित, नागपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दत्ताराव राठोड, गावरान मस्ती फेम वैभव कुऱ्हाडे (गंठणकुमार),ज्येष्ठ साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर, डॉ.कैलास दौंड,दैनिक झुंजारनेता'चे उपसंपादक उत्तम बोडखे,लोकशक्तीचे संपादक विजय लेंडाळ,सहसंपादक इम्रान शेख,पत्रकार जावेद सय्यद व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. साईनाथ बोडखे हे हे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित सांगवी पाटण येथील सुदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.शिक्षण क्षेत्रा बरोबरच ते सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ठ कार्य करीत आहेत.शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असल्याने त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.साईनाथ बोडखे सर यांनी गेली २५ वर्षात हजारो विद्यार्थी घडविले आहे.आज त्यांचे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना नुकताच अहील्यानगर येथील हॉटेल यशग्रँड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लोकशक्ती महाराष्ट्र गौरव आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक साईनाथ बोडखे यांचे माजी आ. भीमराव धोंडे,प्रशासन अधिकारी शिवदास विधाते, डी.बी राऊत,माऊली बोडखे, संदीप नन्नवरे,सागर वाघुले, पत्रकार उत्तम बोडखे,समीर शेख,सेवानिवृत्त प्राचार्य महादेव दानवे,मुख्याध्यापक बाळासाहेब राऊत यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या