
आष्टी (प्रतिनिधी) आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी यांचे स्मृती प्रित्यर्थ आनंदराव
धोंडे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२५ विद्यार्थ्यांचे कला
गुणांना वाव मिळण्यासाठी, नवनवीन विचार रुजवण्यासाठी,वक्तृत्व गुण कौशल्य वृध्दिंगत
करण्यासाठी व संपन्न व्यक्तिमत्त्व निर्मितीसाठी १५ वर्षापासून सातत्याने ही
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते.यावर्षी वक्तृत्व स्पर्धा बुधवार
दि.२४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा.होणार आहे.आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी
महाविद्यालय आयोजित आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी यांचे स्मृती प्रित्यर्थ आनंदराव
धोंडे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न होत आहे.या स्पर्धेत
सहभाग घेऊन वक्तृत्व कला वृद्धींगत करावी.पारितोषिके प्रथम क्रमांक - १० हजार रु.,
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक - ७ हजार रु. स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक -५ हजार रु.स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ (दोन बक्षिस) १,५००
रु - स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचे विषय ------------
अर्थव्यवस्थेतील स्टार्टअप-औद्योगिक नव क्रांती,महिलांचे नेतृत्व- बदलती
मानसिकता,भारतीय लोकशाहीचा प्रवास: १९५० ते २०२५ हे विषय आहेत.या स्पर्धेचे
पारितोषिक सांघिक प्रथम पारितोषिक -आनंदराव धोंडे फिरता करंडक व प्रमाणपत्र
राहील.वैयक्तिक पारितोषिक -प्रथम क्रमांक - १० हजार रूपये, स्मृतिचिन्ह व
प्रमाणपत्र,द्वितीय क्रमांक - ७ हजार रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र ,तृतीय
क्रमांक - ५ हजार रूपये , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ (दोन बक्षिसे)
प्रत्येकी १,५०० रु.हजार रूपये व प्रमाणपत्र असे आहे.नियम व अटी -स्पर्धा
महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली
राहील.स्पर्धकांनी आपले विचार मराठी भाषेत व्यक्त करावेत.स्पर्धेत सहभागी झालेल्या
सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक
असून स्पर्धेसंबंधी नियमात काही कारणाने बदल करण्याचे हक्क संयोजकांनी राखून ठेवले
आहेत. महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांच्या एका संघाला स्पर्धेत सहभागी होता
येईल.स्पर्धक संघाने प्राचार्यांचे संमतीपत्र व ओळखपत्र स्पर्धे अगोदर संयोजन
समितीकडे द्यावे.या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरून नोंदणी
करावी. खालील लिंकवर जाऊन व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा. दि.२३ डिंसेबर २०२५ पर्यंत
नोंदणीसाठीची गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध राहील. ही संपूर्ण स्पर्धा (ऑफलाईन) म्हणजेच
प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये घेतली जाणार आहे सर्व स्पर्धकांनी व्हाट्सअप
ग्रुपमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे.स्पर्धेसंदर्भात महत्वाचे अपडेट आपणास देण्यात
येतील.स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखांच्या
विद्यार्थी- विद्यार्थिनींना खुली राहील.कनिष्ठ महाविद्यालया तील दोन व वरिष्ठ
महाविद्यालयातील दोन असे एकूण चार स्पर्धेकांना पाठविता येईल. प्रत्येक स्पर्धकाकडे
महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. संघाने प्राचार्यांचे संमतीपत्र
संयोजकाकडे देणे गरजेचे आहे.स्पर्धेचे माध्यम केवळ मराठी भाषा असेल. प्रत्येक
स्पर्धकाला ०५ + ०२ = ०७ मिनिटे वेळ दिला जाईल.परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक
असून स्पर्धेसंबंधी नियमात काही कारणाने बदल करण्याचे हक्क संयोजकांनी राखून ठेवले
आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. प्रत्येक संघास १०० रु
प्रवेश फी राहील. स्पर्धकांची निवास व भोजन व्यवस्था केली जाईल.स्पर्धकांचा प्रवास
खर्च संबंधित महाविद्यालयानी करावा.दोन किंवा त्याहून अधिक स्पर्धकास समान गुण
मिळाल्यास पारितोषिक विभागून दिले जाईल.संयोजन समिती- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगरचे अधिसभा व विद्यापरिषद सदस्य प्राचार्य
डॉ.हरिदास विधाते,उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एस.खैरे,प्रा.डॉ.
जी.पी.बोडखे,प्रा.डाॅ.एस.डी. गायकवाड,विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा
यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या