
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील चिखलीचे प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते,
उद्योगपती बबनदादा शिंदे यांना अलिकडेच महाराष्ट्र भुषण राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न
पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार
गोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव
तालुक्यातील वडुज येथे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते बबनदादा
शिंदे यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. चिखली या गावामध्ये
सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आदि कार्यक्रमांमध्ये बबनदादा शिंदे यांचा मोठा
सहभाग असतो. या छोट्या गावाला हा मोठा सन्मान मिळाला आहे. चिखलीचे सामाजिक
कार्यकर्ते, कार्यतत्पर आणि समाजसेवेचा वसा घेतलेले बबनराव शिंदे यांना महाराष्ट्र
भूषण राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. या गौरवामुळे केवळ
चिखलीचीच नव्हे तर संपूर्ण आष्टी तालुक्याची मान उंचावली आहे. कोरोना काळात जेव्हा
सर्वत्र भय आणि अनिश्चिततेचे वातावरण होते तेव्हा बबनदादा शिंदे यांनी 'सेवा हीच
श्रद्धा 'या भावनेतून ग्रामस्थांना किराणा किट,मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून
मानवता जापली आहे. चिखली गावामध्ये येथे विविध जयंती, उत्सव,सामाजिक उपक्रम,हरिनाम
सप्ताह आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेत महापंगत,अन्नदान केलेले
आहे. विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.अनेक उपक्रमांद्वारे समाजसेवा
केली आहे करीत आहेत. बबनदादा शिंदे हे दरवर्षी आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या
सर्व वारकऱ्याला नाष्टा व चहा मोफत देतात.यांच्या कार्यातून समाजाच्या प्रत्येक
घटकाला स्पर्श करणारा संवेदनशील दृष्टीकोन दिसून येतो.रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी
शिबिरे, अन्नदान,किराणा किट वाटप आणि गोरगरीबांसाठी आर्थिक मदत हे त्यांच्या
सततच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.दिवाळी, पाडवा,जयंती प्रत्येक सणासुदीला ते
जनतेसोबत असतात.सेवाभाव हा बबनदादा शिंदे यांचा संकल्प आहे. अनेक वर्षापासून ते
आ.सुरेश धस यांचे समर्थक म्हणून ते राजकीय कार्य करीतात.ते जनहिताला सदैव प्राधान्य
देतात. त्यांच्या या निःस्वार्थ, विकासाभिमुख आणि मानवता, सेवाभावाचा गौरव म्हणून
महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार बबनदादा शिंदे यांना मिळाला आहे.या
पुरस्काराबद्दल आ.सुरेश धस, नवनाथ चखाले, गणेश लाहोटी, लक्ष्मण रेडेकर,सोपान कोकणे,
ज्ञानदेव रेडेकर,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, आकाश टकले, शरद रेडेकर,राजेंद्र
लाड,अण्णासाहेब साबळे,आजी, माजी सरपंच,पोलीस, चिखलीचे ग्रामस्थ,पत्रकार, सामाजिक
कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.डीएसपी न्युज लाईव्ह चॕनलच्यावतीने सामाजिक
कार्यकर्ते बबनदादा शिंदे यांना हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
-----------------
0 टिप्पण्या