Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथील माऊली मंदिर येथे इंग्रजी भाषेतून वारकरी शिक्षण संस्था सुरू करणार! ....... वारकरी संप्रदायाची पताका परदेशात पोहोचावी हाच उद्देश ...... माजी आ.भीमराव धोंडे यांची घोषणा

आष्टी (प्रतिनिधी) जून २०२६ महिन्यामध्ये आष्टी येथील माऊली मंदिर याठिकाणी वारकरी शिक्षण संस्था सुरू करणार असून त्यामध्ये विशेषतः इंग्रजी भाषेतून शिक्षण मिळावे या अनुषंगाने इंग्लिश वारकरी संस्था आणि मराठी वारकरी संस्था अशा सुरू करण्याची घोषणा आष्टी, पाटोदा,शिरूरचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे. आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे बाळूमामाच्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी माजी आ. भीमराव धोंडे बोलत होते. इंग्लिश भाषेतील वारकरी संस्था आणि मराठी भाषेतील वारकरी संस्था अशा दोन्ही सुरू करून आपण वारकरी संप्रदायातील संस्कार आणि ज्ञानाची ध्वज आणि पताका जगभर नेणार आहोत.माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ही घोषणा केली आणि उपस्थित हजारो भाविक भक्तांनी त्यांच्या घोषणेचे प्रचंड टाळ्या वाजवून स्वागत केले.यासंदर्भात पुढे बोलताना माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की, इंग्लिश वारकरी संस्था करण्याचा उद्देश असा आहे की, जर महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्याही बाहेर आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्कार, अभंग आणि साहित्य पोहोचवायचे असेल तर इंग्रजी भाषेतूनसुद्धा कीर्तनकार तयार झाले पाहिजेत आणि या कीर्तनातून आपल्या महाराष्ट्र भूमीतील संतांचे विचार देशभर आणि जगभर पोहोचले पाहिजेत असे सांगीतले. चौकट -------- माजी आ.भीमराव धोंडे यांच्या घोषणेचे स्वागत! ------------------------- आज आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे संत बाळूमामांच्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी माजी आ. भीमराव धोंडे यांनी आपल्या मनोगत प्रसंगी ही घोषणा केली. इंग्रजी आणि मराठी भाषेतून संत साहित्य जगभर पोहोचण्याचा या संकल्पनेचे उपस्थित तालुक्यातील भाविक भक्तांनी स्वागत करून धोंडे यांच्या संकल्पनेला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. --------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या