आष्टी (प्रतिनिधी) शिक्षणातून विद्यार्थी घडत असतात परंतु हे शिक्षण देण्यासाठी
अभ्यासू प्रभावशील, व्यक्तिमत्त्वाच्या गुरुजींची आवश्यकता असते. त्यासाठी नियमित
शिक्षक भरती आवश्यक असते परंतु गत अनेक वर्षापासून अनेक शाळांना शिक्षक नाहीत
तरीसुद्धा शिक्षक बांधव शिक्षण क्षेत्रातील कसरत योग्य करत आणि ऑनलाईन काम करून
विद्यार्थ्यांना घडवतात. आष्टी तालुक्याच्या चोभानिमगाव अंतर्गत झोपडपट्टी भागातील
या शाळेतील बहाद्दर शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न आणि संस्कारातून
पुढे जाण्याचा मार्ग दाखवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.आष्टी तालुक्यातील
चोभा निमगाव अंतर्गत असलेल्या झोपडपट्टी येथील जि.प.प्राथमीक शाळा... पहिली ते चौथी
या चार वर्गामध्ये 82 विद्यार्थी पटसंख्या आहे.येथे मुख्याध्यापक म्हणून हनुमंत
जाधव, सहशिक्षक अशोक झगडे,हरदास

ढोबळे हे तीन शिक्षक अध्यापनाचे कार्य करत आहेत. या तीनही
शिक्षकांनी अत्यंत प्रमाणिकपणे जीव ओतून या अत्यंत ग्रामीण सर्वसामान्य परिवारातील
विद्यार्थ्यांना घडवून समाधान घेण्याचा प्रयत्न केला आहे.हे विद्यार्थी भविष्यात
विविध क्षेत्रात जाऊन आपला नावलौकिक करतील याचा विश्वास आता पालकांनाही वाटू लागला
आहे. आष्टी तालुक्यातील झोपडपट्टी भागातील ही एकमेव शाळा आहे की,ज्या शाळेमध्ये 80
विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे.याचे सर्व श्रेय या शाळेतील अत्यंत
आनंददायी शिक्षण देणारे व उपक्रमशील आणि अध्यापनाचे पवित्र काम करणारे शिक्षकांना
जाते.हे शाळा आष्टी तालुक्यातील आदर्श शाळा होईल अशी मला खात्री आहे असे मत ज्येष्ठ
पत्रकार उत्तम बोडखे यांनी शाळेला भेट दिल्यानंतर व्यक्त केली.
--------------
चौकट
---------
पहिली ते चौथी
वर्गात 82 पटसंख्या
----------------
अत्यंत ग्रामीण
भागामध्ये असलेल्या या झोपडपट्टी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता
पहिली ते चौथी वर्ग आहेत. या चार वर्गामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये सुद्धा एकूण 82
विद्यार्थी शिक्षण घेत असून ही पटसंख्या सध्याच्या काळामध्ये या शिक्षकांच्या कार्य
शिक्कामार्फत करणारी आहे. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी शाळेला
आवर्जून भेट देत माहिती घेतली असता उपक्रमशील आणि आनंददायी अध्यापन कार्याबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त करून शिक्षक बांधवांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या