Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईतील संमेलनात कवी अविनाश डाऊल यांनी केली कविता सादर...

आष्टी (प्रतिनिधी) मुंबई नायगाव शारदा सिनेमा येथे झालेल्या प्रितगंध फाउंडेशन मुंबई संमेलनात कवी अविनाश रामचंद्र डाऊल राहणार सावर्डे दत्तमंदिर घाणेकरवाडी यांनी आपल्या दर्जेदार कविता सादर केली.या राज्यस्तरीय कविसंमेलनात (प्रीत -तुझी -माझी) ही कविता सादरीकरण केले. तसेच प्रितगंध फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पोस्टर कार्ड स्पर्धेमध्ये प्रीत तुझी माझी या कवितेला उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक प्राप्त केला. कवी अविनाश रामचंद्र डाऊल यांना नामांकीत व निमंत्रित कवी, साहित्यिका सन्मा डॉ.शितल मालुसरे मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डॉ.अतुल दारासिंग राठोड,प्रमुख सामाजिक कार्यकर्ते डॉ.राम शिंदे,संतोष महाडेश्वर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या