
आष्टी (प्रतिनिधी)
'...कुंभार ज्याप्रमाणे आपल्या मातीतून आपल्या सुंदर हस्तकला
बनवतो,नूतन अत्यंत उपयोगी वस्तू बनवतो.अनेकदा त्यातून तेजस्वी प्रकाश पणती देते..
तर अनेक जण माठातून थंडगार पाणी पिऊन तृप्त होतात; तर अशाच अनेक कुटुंबातून आपल्या
संस्कारक्षम पवित्र शिक्षणातून राष्ट्राची पिढी निर्माण होते.घरातील योग्य
संस्कार,शांत,संयमी,बंधुत्व,ऐक्य विचारशील अशा मूल्यात्मक बाबींना सदैव सोबत ठेवत
मुलांवर योग्य संस्कारातून सक्षमपणे घडवले जाते.बीड जिल्ह्याच्या आष्टी येथील बोडखे
परिवार हा संस्कार परिवार म्हणून ओळखला जातो.गेल्या 35 वर्ष निरंतर पत्रकारितेमध्ये
अध्यात्म शिक्षण समतोल राजकीय आणि सामाजिक लिखाण यातून दमदारपणे पाऊल ठेवून पुढे
जाणारे व्यक्तिमत्व.त्यांच्या सौभाग्यवती शिक्षिका सौ. बबीताताई बोडखे या पवित्र
शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.मुलगी डॉक्टर,एक मुलगा शिक्षक,दुसरा
व्यवसायामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्यरत असतात.उत्तमराव बोडखे यांच्या
संस्कारक्षम परिवारातील नातवंडे अर्थात हसतमुख जोडी असलेले चि.रियांश व चि. आदिराज
हे भविष्यातील सक्षम वारसदार असतीलच..किंबहुना या परिवारातील संस्कारातून एक चांगला
सक्षम नागरिक मात्र नक्की बनतील अशा या छोट्या जोडीचा आज 20 नोव्हेंबर 25 रोजी
गुरुवारी वाढदिवस आहे.या हसतमुख,निखळ,नटखट तेजस्वी उमेदीचा चेहरा असलेल्या या
जोडीला शुभेच्छा देण्यासाठी बोडखे परिवारावर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील
असंख्य गुणीजनांची उत्सुकता हा मौल्यवान क्षणाचा भाग आहे.गेल्या अनेक दशकापासून
अनेकांच्या आनंदी क्षणामध्ये स्वतःला झोकून देत त्यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा
यासह अनेक पारिवारिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत योगदान देणाऱ्या बोडखे परिवारातील
या आनंददायी वाढदिवस सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!!
0 टिप्पण्या