
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील गानकोकीळा ह.भ.प.साध्वी सोनली दिदी करपे महाराज
यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली महंत चैतन्य महाराज यांचे आयोजन तसेच श्री
रोकडेश्वर श्री गुरु कल्याणस्वामी व श्री गुरु गुलाबबाबा यांच्या कृपेने चकलंबा
येथील श्री क्षेत्र सद्गुरु कल्याण स्वामी संस्थानचा भव्य कलशरोहन सोहळा,अखंड
हरिनाम सप्ताह,११ कोटी नामजप व त्रिकाळ हरिपाठ सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. कलशरोहन
श्री नारायणमुनी (सुरत नवसारी),ह.भ.प. शिवाजी महाराज नारायणगड, महंत नामदेव शास्री
भगवानगड,ह.भ.प.महादेव महाराज भारती,महंत विठ्ठल महाराज शास्री गहिनीनाथगडकर,ह.भ.प.
नवनाथबाबा गोरक्षनाथटेकडी, महंत स्वामी जनार्धन महाराज, महंत त्रिवेंद्रानंद
सरस्वती,महंत राधाताई महाराज,महंत शुक्लभारती महाराज,महंत दत्ता महाराज गिरी,महंत
प्रल्हाद महाराज विघ्ने,महंत वैद्यनाथ शास्री,महंत विवेकानंद शास्री, विजय महाराज
सुलाखे,महंत शंकर महाराज,महंत नामदेव महाराज शेकटेकर,महंत स्वामी योगीराज
महाराज,श्रीहरि महाराज पवार,महंत बाबा महाराज गिरी,महंत रामगिरी, महंत सुरेश महाराज
कोळेकर, वाळकेबाबा यांच्या शुभहस्ते होणार आहे.या सप्ताहात मंगळवार दि.१८ नोव्हेंबर
रोजी रात्री समाजप्रबोधनकार ह.भ. प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरीकिर्तन
झाले.बुधवार दि.१९ नोव्हेंबर रोजी रात्री महंत आदिनाथ महाराज तारकेश्वरगडकर यांचे
हरीकिर्तन झाले. आज गुरुवार दि.२० नोव्हेंबर रोजी रात्री गोरक्षक रामायणाचार्य
ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांचे हरी किर्तन होणार आहे. शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर
रोजी रात्री ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, शनिवार दि.२२ नोव्हेंबर रोजी रात्री
ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर,रविवार दि.२३ नोव्हेंबर रोजी रात्री धर्मगुरु
अमृताश्रम स्वामी महाराज बीड तर सोमवार दि.२४ नोव्हेंबर रोजी या धार्मिक
कार्यक्रमाच्या संयोजिका साध्वी सोनाली दिदी करपे यांचे महाराज यांचे हरिकीर्तन
होणार आहे. मंगळवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळात कीर्तन केसरी
अक्रुर महाराज साखरे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.या धार्मिक कार्यक्रमाला
मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भागवताचार्य ह.प.भ.सोनाली दिदी यांनी केले
आहे. ------------------
0 टिप्पण्या