आष्टी (प्रतिनिधी)
वैद्यकीय पदव्यूत्तर प्रवेश परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर
झाला असून डॉ.संकेत शांतीलाल जायभाये याने ऑल इंडिया ओबीसीतून २६१ रँक मिळून
उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे.या यशाबद्दल माजी मुख्याध्यापक दिनकर बांगर आणि
नागरगोजे यांनी त्याचे विशेष कौतुक करत सत्कार केला आहे.डॉ.संकेत हा प्रा. शांतीलाल
जायभाये यांचा मुलगा आहे. यापूर्वीही त्याने एमबीबीएस परीक्षेमध्ये उत्तम गुण
प्राप्त करून नावलौकिक वाढवलेला आहे.एम्स या वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर
परीक्षेमध्ये त्याने ओबीसी मधून २६१ वी. रँक मिळवत उच्चतम प्रचंड जिद्द चिकाटी
आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर यश हाशील केले आहे.या यशाबद्दल डॉ. संकेत याचे
सर्वत्र अभिनंदन होत असून डॉ.संकेत जायभाये यांचे सहकार व शिक्षण महर्षी रामकृष्ण
बांगर,प्रगती शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. सत्यभामाताई बांगर, युवा नेते
विजयसिंह बाळा बांगर, प्राचार्य बी.टी. खाडे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील
मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
चौकट

---------
डॉ. संकेत व त्याचे वडील प्रा.
शांतीलाल जायभाये आणि आई सौ.सविताताई जायभाये या पालकांचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ
महाविद्यालयीन मराठी भाषा विषय महासंघाचे बीड जिल्हा सचिव प्रा.बिभिषण चाटे आणि
नेट,सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या बीड जिल्हा समन्वयक डॉ.आशा चाटे यांनी विशेष
कौतुक करून अभिनंदन केले.
0 टिप्पण्या