
आष्टी (प्रतिनिधी)
जे आपले ध्येय आहे ते साध्य केले तरीही थांबू नका आयुष्यभर शिकत रहा असे प्रतिपादन रामकृष्ण हाॕस्पीटलचे संचालक प्रसिद्ध पेडियाट्रिक डॉ.संदीप रामकृष्ण हंबर्डे यांनी केले.संभाजीनगर येथील परिवर्तन कॉम्प्युटर्सच्या वतीने आयोजित केलेल्या सी.ए.वसुधा तांबे हिच्या कौतुक सोहळ्यात ते मप्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कॉ.भास्कर लहाने, प्रा.सचिन शिंदे,कॉ.मधुकर खिल्लारे,कॉ. वसुधा कल्याणकर,नवनाथ
तांबे व बाळू बोधक यांची उपस्थिती होती.
जयभवानीनगर येथील सर्व
सामान्य कुटुंबातील वसुधा तांबे हिने मोठ्या जिद्दीने व कठोर मेहनत करून चार्टर्ड अकाउंट (सी.ए.)परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तर पुजा टेके हिने एनसीसी कॅडरमधून १७ लेबेल्स पास करून दिल्ली येथे
प्रजासत्ताक दिनी परेड सादर केल्याबद्दल प्रमुख
मार्गदर्शकांच्या हस्ते आजीच्या गोष्टी पुस्तक भेट देऊन सत्कार केला.प्रा.सचिन शिंदे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगीत विभाग येथे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानिमित्त सत्कार करण्यात आला.त्यांनी
सांगितले की,मीदेखील परिवर्तन कॉम्प्युटर्सचा
विद्यार्थी आहे.मला इथेच खुप काही शिकायला मिळाले व शाहीर वसुधा कल्याणकर यांच्या कलापथकातून संगीताची व कलेची आवड निर्माण होत गेली.वसुधा तांबे हिने विद्यार्थी व पालकांना उद्देशून सांगितले की, विद्यार्थ्यांना आपले उच्च ध्येय गाठायचे असेल तर सोशल मीडियापासून दूर राहून आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे.पूजा टेके हिने सांगितले की, एनसीसीमध्ये
असतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.हिणवले गेले पण तिने हार मानली नाही म्हणून कोणत्याही अडचणी आल्या तरी विद्यार्थ्यांनी खचून
न जाता स्वतःवर विश्वास ठेवावा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसुधा
कल्याणकर यांनी परिवर्तन कॉम्प्युटर्सच्या उपक्रमाची
माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात असे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते करण पवार, स्वामी घुले,पिंपळे,मानसी थुटे, वैष्णवी समुद्रे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.सोमनाथ बीर,टेके,प्रशांत वाव्हळे,आदिती भालेकर, प्रीती शेरे,प्रियंका टेके,कमलेश पारवे, यांच्यासह विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------
0 टिप्पण्या