
आष्टी ( प्रतिनिधी )
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या आष्टी शहरातील शिवतीर्थ याठिकाणी गृहप्रवेश आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक शौर्य पराक्रम आणि प्रजाहित दक्षतेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णा कृती पुतळ्याचे अनावरण आणि मुख्यमंत्री पंचायतराज संवाद मेळावा आयोजन आज शुक्रवार दि.१४ नोव्हेंबर रोजी दु.१२.५ वा.यावेळी करण्यात आले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले महाराज यांचे शुभहस्ते आणि मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचे संवाद मेळाव्याचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ.सुरेश धस हे भूषवणार आहेत यावेळी पद्मश्री पोपट पवार,खा.बजरंग सोनवणे, निलेश लंके,खा.नितीन पाटील पुणे आणि पुणे येथील यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी आदि मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी आणि हजारो सरपंच उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या