Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्यपूर्ती,निष्ठा, आणि सामाजिक बांधिलकी जपणारे दत्ताभाऊ काकडे

आष्टी तालुक्यातील पत्रकारिता आणि सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी पार पाडणारे दत्ताभाऊ काकडे हे आगळे व्यक्तिमत्व असून आष्टी तालुक्यातील सतत चर्चेत असणारे आणि प्रभावशील व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांचा समावेश होतो.किन्हीसारख्या ग्रामीण भागात जन्म घेऊन जन्मजात असलेले स्वभावातील चातुर्य, प्रचंड कष्ट करण्याची तयारी आणि मुख्य म्हणजे मोठ्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करत उद्दिष्टापर्यंत पर्यंत पोहोचणे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे.पत्रकारिता करत असतानाच एकदा सरपंच पद मिळाले असताना हीच सुवर्णसंधी समजून सरपंच परिषदेचे माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य करून प्रदेशाध्यक्षापर्यंत प्रवास हा पथक परिश्रमाचा आणि मेहनतीचाच आहे.कुणाकडून काय काम करून घ्यावे ? याचे अचूक तंत्रज्ञान त्यांना प्राप्त आहे.. महाविद्यालयीन जीवन ते सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार.. "व्हाया पत्रकारिता हा त्यांचा प्रवास नवीन तरुणांना निश्चितपणे प्रेरक आहे.जीवनातले चांगले वाईट अनेक प्रसंग त्यांनी अनुभवलेले आहेत.. सुरुवातीला ज्येष्ठ नेते माजी आ. साहेबराव दरेकर आणि नंतर आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय कार्य करत असतानाच.. महाविद्यालयीन जीवना नंतर पत्रकारितेच्या माध्यमातूनच त्यांनी अगोदर इंग्लिश माध्यम शाळा नंतर ॲग्री बिजनेस कोर्स चालवून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले... जयदत्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून.. माती आणि पाणी या विषयावर प्रचंड अभ्यास करून संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे मोठे काम दत्ताभाऊ काकडे यांनी केले आहे.शेतीविषयक विचार आणि कृती यांची सांगड घालून सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरा विषयी असलेली हृदयापासूनची संवेदनशीलता त्यांनी जपली आहे.. गेली पाच-सहा वर्षांपासून पाटलाच्या वाड्याचे बांधकाम सुरू आहे आणि आज अखेर पूर्ण झाले आहे.या भव्य दिव्य शिवतीर्थ निवासस्थानाच्या निमित्ताने त्यांनी कुटुंबासाठी त्यांची कर्तव्यपूर्तता केली आहे.मुलांनी वडिलांनी आपल्यासाठी काय केले आहे ? हे विचारण्यापूर्वीच त्यांनी हे कर्तव्य पूर्ण केले आहे.. सरपंच परिषदेचे काम करत असताना त्यांनी स्वतःचे कुटुंब आणि व्यक्तिगत जीवन बाजूला ठेवून सरपंचांचे दैनंदिन कामकाजाबाबत राज्य शासनाकडे त्यांच्या मागण्यांबाबत सतत पाठपुरावा केल्याने त्यांच्यासाठी अनेक योजना शासनाला राबवाव्या लागल्या आहेत अर्थात सरपंच परिषदेच्या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्रभर फिरता यावे यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी जया काकडे आणि दोन्ही मुलांचा मोठा सहभाग आहे. शिवतीर्थ या स्वतःच्या निवासस्थानाचे बांधकाम आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची आत्मीयता आणि निष्ठा जपत पूर्णाकृती पुतळ्याची शिवतीर्थ या ठिकाणी उभारणी केली आहे आणि त्याचे अनावरण देखील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज यांचे हस्ते पुतळ्याचे अनावरण करताना त्यांनी अनेक योग साधले आहेत. तसेच ग्रामीण विकास विभागाचे मंत्री येणार आहेत हा योग समजून संपूर्ण बीड जिल्ह्यातील सरपंचांना मार्गदर्शन व्हावे म्हणून मुख्यमंत्री पंचायत राज संवाद मेळाव्याचे देखील त्यांनी आयोजन करून सामाजिक बांधिलकीचे प्रदर्शन घडवले आहे. या निमित्ताने त्यामुळे दत्ताभाऊ काकडे यांची कुटुंबा प्रती कर्तव्यपूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची निष्ठा आणि सरपंचां विषयीची सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री पंचायतराज संवाद मेळाव्याचे आयोजन करून त्यांनी सुवर्णयोग साधला आहे.दत्ताभाऊ काकडे यांना शुभेच्छा... -प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे, (जेष्ठ पत्रकार आष्टी)
(जेष्ठ पत्रकार,आष्टी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या