Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त तहसीलदार साहेबरावजी चव्हाण यांच्या तब्येतीची उपमहासंचालक डॉ.कलशेट्टी यांच्याकडून आस्थेवाईकपणे विचारपुस ...... जुन्या आठवणींना उजाळा; निरोगी,आनंदी जीवनासाठी सदिच्छा

आष्टी (प्रतिनिधी‌) महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सेवानिवृत मुख्य सचिव तथा सेवानिवृत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि मुर्शदपूरचे माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण यांचे वडील सेवानिवृत्त तहसीलदार साहेबरावजी चव्हाण (काका) (वय ८६) वृद्धावस्थेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची पायल बंगल्यावर येऊन यशदा पुणेचे उपमहासंचालक डाॕ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी करुन सदिच्छा भेटी प्रसंगी आनंदी निरोगी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.यावेळी कलशेट्टी यांचे मुर्शदपूरचे माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण,सौ.विद्या चव्हाण यांनी पुस्तक भेट देऊन स्वागत केले.यावेळी यशदा पुणेचे आनंद पुसावळे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील,आष्टीचे गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने उपस्थित होते.कलशेट्टी यांनी आवर्जून भेट देत जुन्या काळातील आठवणींना उजाळा देत त्यांच्याशी हसतमुख हितगुज केले.जुन्या काळातील आठवणींना उजाळा देतानाच चर्चेतून त्यांना आनंदी व निरोगी राहण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. सेवानिवृत तहसिलदार साहेबराव चव्हाण यांच्या काळातील राजकीय, सामाजिक,धार्मिक,वैचारिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदीसह प्रशासनातील विविध किस्से आणि आठवणी यावेळी ताज्या केल्या. सेवानिवृत कलेक्टर सुनिल चव्हाण यांचे वडील सेवानिवृत तहसिलदार साहेबराव चव्हाण (काका) यांचे वयाचे ८५ वर्षे झाले आहेत. चौकट -------- संवादातून माणुसकी मूल्यांच्या बांधिलकी ची भावना! ---------------------------- या सदिच्छा भेटी प्रसंगी यशदा पुण्याचे उपमहासंचालक डॉ.कलशेट्टी यांनी केलेले विचारपूस चर्चा,संवाद आणि भेटीतून माणुसकी या मानवी समाज बांधिलकीचे तत्त्व आधोरेखित झाले.सौ.विद्या चव्हाण यांनी चव्हाण परिवाराच्यावतीने पुस्तक देऊन केलेले स्वागत नव्या पिढीला संदेश देणारे ठरले. ​काकडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या