Ticker

6/recent/ticker-posts

अभिजात मराठी भाषेमुळे सांस्कृतिक वारशांचे जतन होईल ......... प्रा.बिभिषण चाटे

आष्टी (प्रतिनिधी) मराठी भाषेला गौरवशाली परंपरा आहे; किंबहुना मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी आणि भाषेचे संवर्धन होण्यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दिलेला दर्जा ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवशाली बाब आहे! असे प्रतिपादन मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा.बिभिषण चाटे यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अभिजात भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न होत आहे.यावेळी प्रा.चाटे मार्गदर्शक बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.सी. वारभुवन होते.मंचावर प्रा.एस.ए.बटुळे,प्रा. बी.के.मुंडे, प्रा.के.एच.सय्यद आदी सह उपस्थित होते.प्रारंभी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत केले.प्रा.चाटे पुढे म्हणाले, मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी आणि संवर्धन होण्यासाठी अभिजात मराठी भाषा या अनुषंगाने जनसामान्यांमध्ये मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख व्हावी हा उद्देश आहे. यामुळे संशोधन व जनजागृती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अभिजात मराठी भाषेमुळे सांस्कृतिक वारशांचे जतन होईल.आर्थिक अनुदान आणि त्यामुळे सहाजिकच भाषेच्या विकासाला गतीही मिळेल असे सांगून ते पुढे म्हणाले, साहित्यिक आणि संशोधनाला चालना मिळेल. एवढेच नव्हे तर जागतिक स्तरावर ओळख होण्यासाठी ही उपयोग होईल. विद्यालयात तज्ञ व्यक्तींची व्याख्याने चर्चासत्रे परिसंवाद कार्यशाळा शिबिरे आदी सह मराठी ग्रंथांची ओळख व्हावी यासाठी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. प्रस्ताविक प्रा.बी.के.मुंडे यांनी; सूत्रसंचालन आर.के.खेडकर तर डी.एस.तळेकर यांनी आभार मानले.कार्यक्रममाला
ाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. चौकट -------- अभिजात दर्जा मिळाल्याने ग्रंथालये सशक्त होतील ------------------------------- मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून राज्यभर तीन ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस; तर ९ ऑक्टोबर पर्यंत अभिजात मराठी भाषा सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न होत आहे. जनसामान्यांमध्ये मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख व्हावी आणि संशोधन, जनजागृती या अनुषंगाने मराठी भाषेच्या सर्वांगीण प्रगती व विकासासाठी हा सप्ताह फलदायी ठरेल!' असे मत प्रमुख व्यक्तींनी भाषणा दरम्यान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या