आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील वटणवाडीचे माजी सरपंच तथा सेवा सह.संस्थेचे चेअरमन सामाजिक कार्यकर्ते भगवान शिनगीरे आणि गटसचिव अरुण पडोळे यांच्या समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव पुन्हा एकदा जिल्हास्तरीय पातळीवर करण्यात आला. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते या दोघांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, हा त्यांचा जिल्हाधिकारींकडून मिळालेला पाचवा सन्मान ठरलाय. त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.या सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी ठोंबरे, जिल्हा उपनिबंधक तोटावार ,सहाय्यक निबंधक अशोक कदम मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिनगीरे यांच्यासमवेत अरुण पडोळे,वैजिनाथ निर्मळ,जेष्ठ तपासणीस शरद आजबे,महेश कोकणे व नवनाथ वाघुले हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या