Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.आशा चाटे -फड यांना पीएच.डी.पदवी प्रदान

आष्टी (प्रतिनिधी) प्रा.आशा बिभिषण चाटे - फड यांना संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडून मानव्य विद्या शाखा अंतर्गत हिंदी विषयात पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रा.आशा चाटे यांनी "प्रभा खेतान के उपन्यासोमें स्त्री चरित्रों का अनुशीलन" या विषयावर संशोधन कार्य केले आहे.त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रो.डॉ.मुरलीधर लहाडे यांचे मार्गदर्शन लाभले.ही पीएच.डी. प्रबंधाच्या अंतिम मौखिक सादरीकरणासाठी रेफरी तथा बाह्य परीक्षक म्हणून उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.योगेश पाटील ; तर अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील हिंदी विभागाध्यक्ष प्रोफेसर डॉ. संजय राठोड; तसेच अनुसंधान केंद्राचे प्राचार्य डॉ.संतोष उंदरे, केंद्रप्रमुख व उपप्राचार्य तथा हिंदी विभागाध्यक्ष प्रोफेसर डॉ. बाबासाहेब कोकाटे यांच्या सह प्रोफेसर डॉ.ललिता राठोड, प्रो.डॉ.राजेंद्र सिंह चव्हाण, डॉ.अमोल पालकर,डॉ.मनोहर शिरसाट यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.श्रीमती आशा चाटे ह्या अहिल्यानगर जिल्ह्यातील समता जोगेश्वरी शिक्षण मंडळांमध्ये कार्यरत आहेत. समता जोगेश्वरी मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती वैशालीताई पवार,सचिव बबनराव पवार, मुख्याध्यापक अरविंद देशमुख,राजेंद्र शिंपी, कल्याण जगताप,किशोर पवार, श्रीमती रेखा हरदास, श्रीमती मोनाली कर्डक,गजानन म्हस्के, गणेश बाबर,अनिल पवार, शिवाजी देशमुख, दयानंद गजभिव यांनी समाधान व्यक्त करत श्रीमती आशा चाटे (फड) यांचे या यशाबद्दल कौतुक केले आहे. चौकट ----------- सर्व 'भाषां'ना न्याय देणारं कुटुंब! ---------------------------
आशा चाटे - फड या हिंदी भाषा अभ्यासक आहेत.'जोहरा एक मूल्यांकन' ही त्यांची लोकप्रिय कादंबरी आहे.त्या एम.ए.हिंदी, बी.एड.,एम.फिल.,सेट,टेट, आणि पीएच.डी.पदवी प्राप्त झाल्या आहेत.पती प्रा. बिभिषण चाटे हे मराठी भाषेचे लेखक व निवेदक आहेत; तर कन्या कु.सिद्धी ही इंग्रजी भाषेत 'पारंगत' असून मुलगा संस्कृत भाषेचा विद्यार्थी आहे. ------------------- विविध पुरस्कार आणि सन्मान! ----------------------- 'जोहरा: एक मूल्यांकन' या त्यांच्या कादंबरीला राजस्थान येथील संगम साहित्य अकादमीचा पुरस्कार तत्कालीन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते प्रदान झालेला आहे.गंगाई- बाबाजी आदर्श शिक्षिका पुरस्कार, मातृभूमी प्रतिष्ठान बीडचा विशेष पुरस्कार, नॉलेज प्लांटचा सावित्रीमाई फुले सन्मान आदी सह विविध जिल्हा, विभाग स्तरावरून त्यांचे सन्मान झालेले आहेत. ---------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या