Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी वार्ताहरचा दीपोत्सव २०२५ अंक लवकरच होणार प्रकाशित.. ............ अभिनेत्री भाग्यश्री मोटेंच्या मुखपृष्ठाची वाचकांना उत्सुकता

आष्टी (प्रतिनिधी) गेले तीन दशकाची तब्बल परंपरा असलेल्या आणि निरंतर वाचकांसाठी विविध साहित्य परंपरा जतन करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा इतिहास निर्माण केलेला आष्टी वार्ताहरच्या दीपोत्सव २०२५ अंक लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देखणी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या अत्यंत सुंदर मुखपृष्ठ असलेली कव्हर स्टोरी हजारो वाचकांसाठी उत्सुकतेचा विषय झाला आहे. सुप्रसिद्ध डिझायनर आकाश डोंगरे यांच्या संकल्पनेतून या कव्हर स्टोरीचा उदय झालेला आहे. अंतरंग अत्यंत विविध रंगांनी नटलेले आणि वाचकांच्या पसंतीस असलेले असा हा दर्जात्मक संयोग जुळून आलेला आहे.बीड जिल्ह्यातील अभ्यासू व जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्या निरंतर दिनदर्शिकाच्या वाढ झाली.आष्टी वार्ताहरचा दीपोत्सव हा अंक वाटचाल करीत आहे.यंदाचा दीपोत्सव २०२५ अंक विविध कलागुणांनी आणि गुणवत्तेने नटलेला आहे.अंतरंगात समृद्ध विचारांची देखणी गुनी अभिनेत्री भाग्यश्री मोटेची कव्हर स्टोरी.. आकाश डोंगरे यांनी केलेले डिझाईन वाचक रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे.विविध कथांचा यामध्ये सहभाग असून प्रा.डॉ.भास्कर बडे, प्राचार्य सुनील शेळके,प.पूज्य माऊली यांच्या कथांना स्थान देण्यात आले आहे. नामवंत लेखकांच्या लेखाचाही यात समावेश करण्यात आलेला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, संत शेख महंमद बाबा,कवयित्री सुहासिनी इर्लेकर, शायर मुन्नवर राणा, थोर स्वातंत्र्य सेनानी स्व.साहेबराव थोरवे दादा,जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे,डॉ. अशोक गांधी,डॉ. विलास सोनवणे, संपादक अजितदादा वरपे,वृक्षमित्र रंगनाथ धोंडे,दिव्या गायकवाड,ज्येष्ठ पत्रकार सिताराम पोकळे यांच्यावरील विशेष लेख.कवी कैलास दौंड,कवी संजय शेळके,कवी मारुती जाधव,कवी सुरेश तळेकर, शाहीर बारकू कांबळे यांच्या कविता.या वाचनीय अंकाचे रसिक स्वागत करतील कवी आणि कवयित्रींच्या कवितांमुळे हा अंक रसाळ गोडवा देणारा ठरणार आहे. दरम्यान गेल्या ३० वर्षांमध्ये आष्टी वार्ताहरच्या दीपोत्सवाचे नियमित वाचक यांच्यासाठी हा विविध साहित्य यामधून निर्माण झालेली कलाकृती वाचकांच्या सेवेत लवकरच प्रकाशित होऊन कर्तव्यपूर्ती करू असा विश्वास माध्यमांसमोर बोलताना अंकाचे संपादक उत्तम बोडखे यांनी दिला. लेखन शक्तीच्या गुणवत्तेवर समाज व्यवस्थेची भविष्यातील शाश्वत इमारत उभी असते. आष्टी वार्ताहर या दिवाळी अंकाच्या माध्यमातून वाचकाला सर्वस्पर्शी ज्ञान मिळते.सर्व क्षेत्रावर खऱ्या अर्थाने आपल्या भारदस्त लेखणीच्या माध्यमातून नवा अध्याय निर्माण करणारा हा दिवाळी अंक सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी आहे.समाजातील विविध क्षेत्रातील कलावंताना साहित्यिकांच्या कलागुणांना शब्दबद्ध करत न्याय देण्याच्या भावनेतून गेली ३१ वर्षापासून दिवाळीनिमित्त वार्ताहरचा दीपोत्सव हा अंक वाचकांसाठी पर्वणी आहे.आष्टी शहरातुन प्रकाशित होणारा आष्टी वार्ताहर 'दीपोत्सव' अंक सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारा दर्जेदार दिवाळी अंक आहे.आष्टी वार्ताहर दीपोत्सव हा दिवाळीनिमित्त प्रकाशित होत असलेला विशेषांक वाचनीय ठरणार आहे.राजकीय, सामाजिक, आर्थिक,धार्मिक, वैचारिक , सांस्कृतिक, शैक्षणिक आदींसह विविध क्षेत्रातील कलागुणांना या अंकाच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आले आहे गुणी कलावंत, साहित्यिक यांना न्याय आणि सामाजीक बांधिलकीच्या माध्यमातून समाजसेवकांच्या कार्याला बळ देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.गेली ३० वर्षांपासून अविरत, सातत्यपूर्ण दिवाळी निमित्त वार्ताहर दीपोत्सव अंक हा वाचकांना दिला जातो.३१ वर्षाची परंपरा असलेल्या पत्रकार उत्तम बोडखे संपादित आष्टी वार्ताहर दिवाळी अंकात विशेष कव्हर स्टोरी,कथा, कविता,विविध विषयांवर लेख, उपाहासिका आहेत. ------------- चौकट -------- अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिची कव्हर स्टोरी ---------------- आपल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर छोट्या पडद्यावर झळकताना आपल्या मातीशी प्रमाणिक राहून जनसामान्यांच्या व्यथांना अत्यंत प्रमाणिकपणे साजरीकरण करून आणि आपल्या देखण्या समृद्ध विचारांच्या आणि अनुभवांच्या बळावर अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने निर्माण केलेले वलय नवीन कलावंतांसाठी प्रेरणा बनू शकेल. या समवेतच तिच्या या सुंदर छबीची प्रचंड उत्सुकता वाचकांसाठी असेल. ---------------- चौकट --------- आष्टी वार्ताहर दिवाळी अंक वाचकांचा आत्मा.. ------------------
३१ वर्षाहुन अधिक परंपरा असलेला आष्टी वार्ताहर दिवाळी अंक हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांना व्यक्त करत विविध क्षेत्रातील वेगळेपण जपणारा आहे.साहित्य लेखकांची यातील लेखणी गुणसंपन्न असल्याने बीड जिल्हावाशियांना ती पर्वणी ठरत आहे.या अंकाची उत्सुकता जिल्हावासियांना लागून राहिली आहे.आपण शुद्ध मनाने जो निश्चय करू तोच शुभमुहूर्त आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटणे हीच खरी ईश्वर सेवा समजून प्रयत्नांती परमेश्वर हेच खरे मानून गेल्या ४० वर्षापासून अहोरात्र शब्दांशी खेळून समाजपरिवर्तन आणि संस्कारासाठी आष्टी वार्ताहर या दिवाळी अंकाच्या माध्यमातून राबणारे,झिजणारे बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांची तपश्चर्या त्यांचे कष्ट कौतुकास्पद आहेत. बीड जिल्ह्यातील ४० वर्ष पत्रकारितेची तपश्चर्या करून शब्दांमधून मोती निर्माण करणारे पत्रकार उत्तम बोडखे यांच्या माध्यमातून आष्टी वार्ताहर दिवाळी अंक विविध अंगांनी नटलेला आणि गुणवत्तेने परिपूर्ण असा हा अंक दरवर्षी हजारो वाचकांना उत्सुकता देणारा ठरणार आहे. यंदाच्या या आष्टी वार्ताहर दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे येथे अभिनेत्री भाग्यश्री मोटे हीच्या यांच्या शुभहस्ते होणार आहे.या अंकातील विविधता शब्दयोजना साहित्यातील गुणवत्ता,काव्य, कला,क्रीडा,मराठी वांग्डमय भाषा तसेच विविध कलागुणांनी संपन्न असा हा अंक अत्यंत हृदयस्पर्शी आणि वाचनीय ठरणार आहे. आपल्या शब्दातून मनोरंजन आणि इतरांशी मनमोकळा संवाद साधू शकेल अशी रचना तसेच स्पष्ट उच्चार भाषेची आणि संगीताची जाण सर्जनशीलता ,बहुश्रूतता,समय सूचकता आणि निरीक्षण शक्ती यासारख्या अतिउच्च गुणांच्या आधारे हा अंक परिपूर्ण झाला आहे.व्यापक दृष्टीने भविष्यातही आष्टी वार्ताहर दिवाळी अंक आपली गुणवत्ता अधिक वाढवत राहीन असा विश्वासही कवी प्रा.सय्यद आल्लाउद्दीन यांनी व्यक्त केला. ------------------ चौकट --------------- प्रभावी अभिव्यक्तीचा ' उत्तम ' नमुना ................... 'माणसांचे परस्परातील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात यामधूनच साहित्याची निर्मिती होत असते.जसा चित्रकारांचा अनुभव रंगांमधून,गायकाचा अनुभव सुरांमधून, तसा लेखकाचा अनुभव शब्दांमधून व्यक्त होत असतो. संदेश,भावना,विचार यांची देवाण-घेवाण होण्यासाठी प्रभावी अभिव्यक्तीची गरज असते.योग्य,सूचक आणि पोषक शब्दांची योजना त्यासाठी हवी असते.आष्टी वार्ताहर दिवाळी अंकाने हे सर्व गुण पाळले आहेत.यात शंका नाही ! -- प्रा.बिभिषण चाटे -----------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या