ज्ञान ही शक्ती आहे!' मनुष्याच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार आणण्यासाठी आणि मानवी जीवन सुसंस्कृत बनविण्यासाठी ज्ञान महत्त्वाचे असते. या विचारिंनी प्रेरीत झालेले बाबासाहेब मुळीक आहेत.
आष्टी तालुक्यातील
घाटा पिंपरीसारख्या खेडेगावातील तरुण बाबासाहेब मुळीक यांनी छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले,शाहु, आंंबेडकर यांंच्या विचारांची प्रेरणा घेऊन शैक्षणिक जनजागृती केली. बाबासाहेब मुळीक यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला झुकून दिले आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रभावी कार्य करुन खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रमाणिक प्रयत्न केलेला आहे. पुस्तकासारखा सदा सर्वकाळ आपल्या मदतीसाठी तत्पर असणारा मित्र शोधूनही सापडणार नाही.वाचनासारखा दुसरा आनंद नाही. ग्रंथ पुस्तके ज्यांचे उपजीवन आहे. त्यांना इह आणि पारलौकीक जगात वैभव लाभो असे मागणे मागितले आहे.धर्म,संस्कृती व इतिहास यांना जीवंत ठेवण्याचे काम ग्रंथांनीच, पुस्तकांनीच केले आहे.जे जे गुरुकडून मिळणे शक्य आहे ते ते सर्व पुस्तके जे देतात म्हणून पुस्तके हे आपले गुरु आहेत.या विचाराने बाबासाहेब मुळीक सर जगत आहेत. पुस्तके समाज वाचायला शिकवतात,पुस्तके इतिहास घडवायला शिकवतात,पुस्तके ओळख करुन देतात पुस्तके ओळख बनवायला शिकवतात. जगामध्ये सर्वात मोठे ज्ञानाचे केंद्र कोणते असेल तर ती म्हणजे शाळा,ज्ञान दिल्याने वाढते. घेतल्याने शहाणपण येते.अज्ञान नष्ट होते. ज्ञानामुळे स्वाभिमान तर येतोच पण त्याचबरोबर शिस्तसुध्दा आपण शिकतो कारण ज्ञान हे अमृत आहे.त्याचा योग्य उपयोग कसा करावा.हे ज्याला कळले तोच खरा ज्ञानी असतो. प्रत्येकाने वाचायला शिकले पाहिजे. वाचन हे आपल्याला घडवते पण जो वाचतो तो संकटावरचे उपाय शोधू शकतो.अचूक निर्णय घेऊ शकतो पण यासाठीच आपण वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुस्तकांशी मैत्री करावी.मित्र हे स्थलकालानुसार बदलतात.माणसांशी असणारी मैत्री कधी तुटू शकते.माणसात गैरसमज निर्माण होऊन नाते तुटू शकते पण पुस्तकांशी असणारी मैत्री कधीही तुटू शकत नाही.पुस्तक वाचण्याचा छंद सर्वोत्तम छंद आहे. जो हा छंद जोपासेल
त्याच्यावर संकटे येणार नाही.आली तरी मार्ग निघेल एवढी ताकद पुस्तकात आहे.
म्हटलं जात ना,जो वाचतो पुस्तक सुधारते त्याचे मस्तक मग तो स्वाभिमानी होतो.नाही होत कुणापुढे नतमस्तक
आष्टी तालुक्यातील घाटा हे एक छोटे गाव. या गावात बाबासाहेब मुळीक यांचा सर्वासामान्य शेतकरी कुंटुंबात दि.१५ आक्टोबर रोजी जन्म झाला.ते बीड जि.प.चे प्राथमिक शिक्षक आहेत.आ.सुरेश धस यांचे ते महाविद्यालयीन जीवनापासून वर्गमित्र आणि म्हणून नुसता मित्रच नाही तर विश्वासू मित्र आहेत. शिक्षकाने शाळेतच आदर्श असून पुरेसे नसते.शिक्षकाने रस्त्याने आदर्श दिसले पाहिजे. शिक्षकाने मुलांसाठी तर आदर्श असावेच पण शिक्षकाने मुलांच्या पालकांसाठीही आदर्श ठरावे. शिक्षक समाजाचा केंद्रबिंदू असावा. बाबासाहेब मुळीक माझाही काॕलेजमधील मित्र आहे.बाबासाहेब मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख....
---------------

महाविद्यालयात विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत बाबासाहेब मुळीक हा सुरेश धस यांच्या गटात सक्रीय असायचा.सुरेश धस आणि बाबासाहेब मुळीक हे दोघेही निवडून आले. सुरेशरावांच्या बाजुने संख्याबळ कमी होते.सुरेश धस यांना विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष होण्यासाठी विरोधी गटात निवडुन आलेलो मी ..मला पळवुन घेऊन जाण्याचा डाव आखणारा हा बाबासाहेब मुळीक. अतुलशेठ मेहेर, शहाराम लोखंडे , भाऊसाहेब भवर , स्व.सुर्यकांत तरटे आदि मित्रांचा डाव यशस्वी झाला.
धस - मुळीक दोघांची मैत्री आजतागायत ३५ वर्षे टिकून आहे. काॕलेजमध्ये शिकत असतांना तो डी.एड.साठी गेला. डी.एड.झाला.बी.ए. ही झाला.शिक्षक झाला.त्याचबरोबर त्याचे मित्र सुरेश धस बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले.सुरेश धस आमदार झाले.त्यांनी मैत्रीची आठवण ठेवून बाबासाहेब मुळीक यांना जिल्हा परिषदेचे पाच वर्षासाठी स्वीकृत सदस्य केले होते.
मनुष्याने आयुष्यभर विद्यार्थी असावे असे म्हणतात.शिक्षकाने तर नक्कीच आयुष्यभर विद्यार्थी असावे.एकदा बी.ए. होऊन बाबासाहेब मुळीक यांचे समाधान झाले नाही.तो चार वेळा वेगवेगळे विषय घेवून बी.ए. झाला. बी.ए.साठी तीन विषय असतात. बाबासाहेब मुळीक १२ विषयात बी.ए. झाला आहे.तो ही बहिःस्थ (एक्सटर्नल) म्हणूनच.बाबासाहेब मुळीक यांच्या पत्नी सौ.आशा मुळीक - पोकळे याही तीन वेळा बी.ए.,इंग्रजी, इतिहास,शैक्षणिक मानसशास्त्र हे तीन विषयात विशेष प्राविण्य सह एम.ए.उत्तीर्ण आहेत.त्याचबरोबर हिंदी व मराठी विषय घेऊन दोन वेळा बी.एड.उत्तीर्ण आहेत.बाबासाहेब मुळीकचे लग्न झाले तेव्हा त्यांच्या पत्नी दहावी उत्तीर्ण झाल्या होत्या. पत्नीच्या पुढील शिक्षणासाठी बाबासाहेब मुळीक यांनी त्यांना प्रेरणा दिली.स्री शिक्षणाला स्वतःच्या घरापासून सुरुवात केली.ही विशेष बाब आहे. बाबासाहेब मुळीक व आशा मुळीक हे दोघेही आदर्श शिक्षक आहेत.या पतीपत्नीने आपल्या मुलाचे नाव यशवंत ठेवले आहे. बाबासाहेब मुळीक सर चार वेगवेगळ्या विषयात एम.ए. झालेले आहेत. मराठी,इतिहास,
राज्यशास्त्र,
शैक्षणिक व्यवस्थापन व समाजशास्र या पाच विषयात त्याने (एम.ए.) पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या आहेत.एवढ्यावरच तो थांबलेला नाही. त्याने शिक्षकी व्रताला ज्या पदव्या लागतात त्या घेतल्या.तो डी.एड. झाला.त्यानंतर डी.सी.एम.झाला.
मराठी बी.एड. झाला.हिंदी शिक्षा विशारद म्हणजे हिंदी घेवून पुन्हा बी.एड.समकक्ष पदवी घेतली.आता तो प्रबंधाचे काम करातोय.१५ पदव्या घेणारा प्राथमिक शिक्षक आहे. डाॕ.श्रीकांत जिचकरांनी वेगवेगळया विद्याशाखेच्या अनेक पदव्या मिळविलेल्या होत्या. त्यांच्या नावाने विश्वविक्रम केला होता.बाबासाहेब मुळीक यांचा १५ पदव्या घेण्याचा महाराष्ट्रविक्रम आहे.
अनंत हंबर्डे,प्रा. दिलीप घायाळ, स्व.रामराव फिस्के, शक्तीकुमार केंडे, बी.बी.चंदेल,स्व. रत्नाकरभाऊ वरपे, स्व.श्रीपती माने साहेब,माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, आर.जी.कदम,डॉ.
एन.डी.चौधरी,प्रा.आर.एस.मोगल,प्रा.शंकरराव काकडे, नवनाथ गाडे सर यांच्या उल्लेखाबरोबरच ह.भ.प.बबन महाराज,निवृत्ती महाराज बोडखे, रामकृष्ण रंधवे बापू, हरिदास सोळंके महाराज, नामदेवशास्त्री विधाते आदि महाराज मंडळी यांच्या प्रेरणेने आपली वाटचाल सुरु असल्याचे मुळीक यांनी सांगीतले.
आदर्श शिक्षक बाबासाहेब मुळीक यांना वाढदिवसानिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने शुभेच्छा...
------------------
-----लेखक --
उत्तम बोडखे.प
(जेष्ठ पत्रकार)
0 टिप्पण्या