Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करावेत ------ ह.भ.प.ज्ञानदेव महाराज जळकीकर

आष्टी (प्रतिनिधी) सर्व जाती-धर्माच्या लोकांनी परस्परांशी भेदभाव न करता एकत्रित रहावे.समाजात प्रेमभावाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.यासाठी 'गुण्या गोविंदाने' रहाणे अत्यावश्यक आहे.भगवंताचे सतत स्मरण करणाऱ्या माणसाचे मन शुद्ध होते. तो माणुस सर्वांबद्दल प्रेमभाव बाळगतो.सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करावेत असे प्रतिपादन ह.भ.प.ज्ञानदेव महाराज जळकीकर यांनी केले. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुरू आहे.या निमित्ताने आयोजित कीर्तनात ह.भ.प. ज्ञानदेव महाराज जळकीकर हे बोलत होते.या कीर्तनातून त्यांनी समाजात एकतेचा संदेश दिला. ते पुढे म्हणाले की, एक मिनिटामध्ये कीर्तन मंडपात आम्ही भांडण लावून जाऊ शकतो परंतु तुम्हाला गावात राहायचे असते.जगात वारकरी संप्रदाय ज्ञानदानाचे काम करते. जिथे पाय डुलते ती गायक नसते,जिथे मान डूलते ते गायनाचार्य असते.यावेळी सांगवी पाटण व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात गावागावातून आलेल्या भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला.यावेळी महाराजांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या