Ticker

6/recent/ticker-posts

प्राध्यापकांच्या प्रशिक्षणातून संशोधन वृत्ती वाढीस लागेल -- प्रा.मनीषा जाधव

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत जून २०२५ मध्ये पार पडलेल्या दहा दिवसीय उच्च माध्यमिक प्राध्यापकांच्या निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण आज बीड येथे द.बा.घुमरे हायस्कूलमध्ये अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.अत्यंत परिश्रम आणि अभ्यास पूर्ण संपन्न झालेल्या या प्रशिक्षणातून २४ वर्षे पूर्ण झालेल्या उच्च माध्यमिक शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले होते.या प्रशिक्षणाचा निकाल जाहीर झाला असून उत्तीर्ण प्रमाणपत्राचे वाटप आज‌ प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ.विक्रम सारूक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राम सालगुडे, ज्येष्ठ सुलभक तथा मार्गदर्शक श्रीमती मनीषा जाधव, डॉ. शिराज खान पठाण,श्रीमती शेख खदिरा,श्रीमती कामलक्ष्मी पारगावकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी प्राध्यापकांना प्रमाणपत्राचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या माध्यमातून आम्हाला नवा आत्मविश्वास अध्यापन आणि संशोधनासाठी मिळेल असा विश्वास ज्येष्ठ प्रशिक्षणार्थी प्रा.रवी दादा चौधरी, प्रा.मासाळ,प्रा. बिभीषण चाटे,प्रा. गुट्टे ,प्रा.पवार,प्रा. आटोळे,प्रा. किरण मधुरे,प्रा. सुरजकुमार मुंडे, प्रा.व्हि.डी. शिंदे, प्रा.फुलचंद ठोंबरे, प्रा.आत्माराम झिंजुर्डे,प्रा.मुरलीधर राठोड,प्राचंदनशिव,प्रा.दत्तात्रय नेटके, प्रा.वाणी,प्रा.अनिल जोगदंड,प्रा. सिद्धीकी,प्रा. देशमुख यांच्यासह प्रशिक्षणार्थी उच्च माध्यमिक शिक्षक बांधवांनी व्यक्त केला. -------- चौकट -------- प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीसाठी शिक्षक ध्यास घेतील -- प्रा.बिभिषण चाटे --------------- उच्च माध्यमिक शिक्षकांनी जून २०२५ मध्ये १० दिवशीय प्रशिक्षण अत्यंत शिस्तबद्ध आणि परिश्रमक पूर्वक घेतले. या प्रशिक्षणात सुलभकांनी केलेले मार्गदर्शन संशोधन वाढीसाठी दिलेल्या युक्त्या यातून उच्च माध्यमिक शिक्षक कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना नवीन संशोधन आणि त्यातून राष्ट्रप्रेमी नागरिक घडवण्यासाठी सिद्ध होईल! असा विश्वास प्रशिक्षणा मधील सूत्रसंचालक प्रा. बिभीषण चाटे यांनी वितरण प्रसंगी व्यक्त केला. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या