
आष्टी (प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी आणि मनाची संवेदनशीलता अत्यंत प्रगल्भ ठेवून रंजल्या गांजल्या, दिनदलीत, दुबळ्या, अनाथ, अपंग, शेतकरी,शेतमजूर आणि वंचित घटकांच्या वेदनांची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची सातत्याने ऊर्जा असलेले वकील क्षेत्रातील ॲड.डी. एस.ससाणे हे ओळखले जातात.
आष्टी तालुका वकील संघाचे माजी सचिव या पदावर राहिलेले ॲड.डी. एस.ससाणे यांनी यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने गोरगरिबांच्या घरातील आर्थिक स्थितीची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांची गोड दिवाळी व्हावी यासाठी काहीसा हातभार लावत योगदान दिले आहे.आष्टी तालुका वकील संघाचे माजी सचिव ॲड.डी.एस. ससाणे यांनी दिवाळीनिमित्त पिंपरी आष्टी येथील शिवाजी सावंत व सौ.मुक्ताबाई शिवाजी सावंत या अत्यंत गरीब कुंटुंबाची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी शिधा वाटप केला.यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,राजेंद्र लाड, विलास येवले व संतोष सुरवसे उपस्थित होते.
--------------
चौकट
--------
ॲड.ससाणे यांची
प्रेरणा इतरांनी घ्यावी!
------------------
वकील क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकीची आणि संवेदनशील मनाची भावना जपत ससाणे यांनी सर्वसामान्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरावर अत्यंत वाईट वेळ आली आहे.आर्थिक स्थिती गंभीर असल्याने अनेकांना दिवाळी करणे सुद्धा अशक्य झाले आहे. हीच बाब लक्षात घेऊन विधीज्ञ ससाणे यांनी काही गरीब कुटुंबीयांची दिवाळी गोड गोड पदार्थांचा शिधा वाटप करून समाधानी केले आहे ही प्रेरणा इतरांनी घेण्याची गरज आहे.
-------------------
0 टिप्पण्या