

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरात बाबाजी धोंडे कॅन्सर रिसर्च सेंटर व मल्टीस्पेशालिटी
हॉस्पिटलच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.आरोग्य व शिक्षण क्षेत्रात धोंडे परिवाराची
आणखी एक भव्य कामगिरी झाली आहे. आनंद शैक्षणिक संकुलात दीपावली पाडव्याच्या
मुहूर्तावर शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आनंदराव धोंडे कॅन्सर रिसर्च सेंटर
व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नव्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा पार
पडला.याप्रसंगी आष्टी,पाटोदा, शिरूर मतदार संघाचे माजी आ. भीमराव धोंडे, युवा नेते
डॉ.अजय धोंडे, युवा नेते अभय धोंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी
परिसरातील मान्यवर,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.
बोलताना भीमराव धोंडे म्हणाले की, आपल्या ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत व
दर्जेदार उपचार देणे हे आमचे ध्येय आहे. आनंदराव धोंडे कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च
सेंटर हे केवळ रुग्णालय नसून समाजसेवेचे केंद्र ठरेल.शेतकरी, कामगार,सामान्य
नागरिकांना फुकट आरोग्यसेवा देणे हा आमचा प्रयत्न आहे.भीमराव धोंडे पुढे म्हणाले
की, शिक्षण आणि आरोग्य ही समाज विकासाची दोन प्रमुख स्तंभ आहेत. शेतकरी शिक्षण
प्रसारक मंडळाने शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले आहे. आता आरोग्य क्षेत्रातही आपली
संस्था भव्य पाऊल टाकत आहे.हे केंद्र पुढील पिढ्यांसाठी आरोग्य व सेवाभावाचा आदर्श
निर्माण करेल. याप्रसंगी चेअरमन राजेंद्र धोंडे,जेष्ठ पत्रकार उत्तम
बोडखे,अॕड.रत्नदीप निकाळजे,अंकुश मुंडे,पत्रकार विजय जाधव,ग्रा.पं.सदस्य आदेश
निमोनकर, विठ्ठल लांडगे, अजिनाथ गवळी, बाबा ससाणे, प्राचार्य डाॕ.हरिदास
विधाते,प्राचार्य डाॕ. दत्तात्रय वाघ, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी.
राऊत,प्रा.शिवदास विधाते,माऊली बोडखे,संजय शेंडे, संदीप नन्नवरे,सागर
वाघुले,इंजि.पी. बी.बोडखे,प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ, प्राचार्य सुनिल
कोल्हे,प्राचार्य संजय बोडखे,आनंद संकुलातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक व नागरिक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना आयोजकांनी
सांगितले की,या हॉस्पिटलमुळे परिसरातील गरीब, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोफत
व दर्जेदार उपचार उपलब्ध होणार आहेत.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आनंद शैक्षणिक संकुल
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळच्यावतीने करण्यात आले. सुत्रसंचलन प्राचार्य
डाॕ.बाळासाहेब खेमगर तर आभार डाॕ.डी.बी.राऊत यांनुनी मानले. -----------------
0 टिप्पण्या