Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी नागरी पतसंस्थेकडून ८ टक्केप्रमाणे ३४ लाख रु.चा लाभांश वाटप

"
आष्टी (प्रतिनिधी) संपुर्ण मराठवाड्यात सहकार क्षेत्रात नामांकीत आणि बीड जिल्ह्यातील प्रगतशील असलेली आष्टी येथील आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी संस्थेच्या सभासदांना ८ टक्के लाभांश वापट करण्यात आला असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन डाॕ.विलास सोनवणे यांनी दिली. संचालक मंडळाच्या उपस्थितीत संस्थेच्या सभासदांना ८ टक्के प्रमाणे सभासदांना ३४ लाख रु.बुधवार दि.१५ आक्टोबर रोजी लाभांश वाटप केला आहे.आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेने बुधवार दि.१५ आक्टोबर २०२५ पासून लाभांश वाटपाची सुरुवात पतसंस्थेचे चेअरमन डॉ.विलास सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नवनीत कटारिया, संचालक अश्पाक सय्यद, जयचंद चोपडा,बन बुवा, पतसंस्थेचे सचिव काकासाहेब पोकळे,डॉ.मधुकर हंबर्डे, सहव्यवस्थापक आनंद शेलार व सर्व कर्मचारी,सभासद उपस्थित होते.पतसंस्थेचे चेअरमन डाॕ. सोनवणे यांनी प्रत्येक सभासदांनी आपला लाभांश घेवून जावे असे आवाहन केले आहे. आष्टी नागरी पतसंस्थेच्यावतीने दिवाळीनिमित्त ८ टक्के लाभांश तब्बल ३४ लाख रुपये एवढया मोठ्या प्रमाणात लाभांश वाटप केला जाणार असल्याने सभासदांची दिवाळी गोड होणार आहे. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या