Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून महिलांची उत्तुंग ‌झेप ...... गजानन मस्के ....... 'वाचन- प्रेरणा दिनी' डॉ. आशा चाटे यांचा गौरव

आष्टी (प्रतिनिधी) वाचन ही एक अत्यंत मौलिक, मूलभूत आणि अत्यावश्यक बाब असून मानवी जीवनामध्ये विविध क्षेत्रातील येणारे ज्ञान हे वाचनातून येत असते;किंबहुना वाचनातूनच मनोबल वाढले जाते असे सांगत आत्मिक कक्षाही रुंदावतात असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षक गजानन म्हस्के यांनी केले. खरडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत वाचन- प्रेरणा दिन कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या मंचावर विद्यालयातील शिक्षिका डॉ.आशा चाटे -फड यांना नुकतीच डॉक्टरेट ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने प्रदान करण्यात आली आहे.याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ज्येष्ठ शिक्षक गजानन म्हस्के बोलत होते.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे एकूण आयुष्य आणि व्यक्तिमत्व भावी अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे.डॉ.कलाम यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्त्वाकडून प्रेरणा घेत महिलांनीही आपले स्थान निर्माण केले आहे.डॉ.आशा फड यांनी प्राप्त केलेली ही सर्वोच्च पदवी आमचे विद्यालय आणि संस्थेसाठी भूषणावह बाब असल्याचा गौरव ही गजानन मस्के यांनी केला. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ.आशा फड यांनी वाचन लेखनातून प्राप्त झालेले हे यश आपल्या सर्वांच्या सहकार्याचे असल्याचे विनम्रपणे सांगत आभार मानले.या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकट --------- वाचन- प्रेरणा दिनी डॉ.आशा चाटे - फड यांचा सन्मान हा दुग्ध शर्करा योग -------------------------------
डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून केवळ प्रचंड वाचनातून देश आणि जगभर यशाचे शिखर निर्माण केले.हा भारतासाठी अभिमानाचा इतिहास असून आज त्यांच्याच जन्मदिनी अर्थात 'वाचन- प्रेरणा' दिनाच्या मंचावर पीएचडी ही पदवी प्राप्त केल्याबद्दल महिला शिक्षिका डॉ.आशा फड यांचा झालेला सन्मान हा 'दुग्धशर्करा योग' आहे अशा शब्दात मुख्याध्यापक अरविंद देशमुख यांनी कौतुक केले. ------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या