Ticker

6/recent/ticker-posts

सराटेवडगावचे माजी सरपंच प्रा.डाॕ.राम बोडखे यांना पितृशोक

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील आदर्श गांव सराटेवडगाव,आनंदवाडी येथील माजी सरपंच तथा कडा येथील आनंदराव धोंडे काॕलेजचे प्रा. डाॕ.राम बोडखे आणि आष्टी येथील पं.जवाहरलाल नेहरु विद्यालयाचे प्राचार्य सुरेश बोडखे यांचे वडील सराटेवडगाव सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन गहिनीनाथ भाऊ बोडखे (नाना) (वय ९०) यांचे आज शुक्रवार १० आक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.अंत्यविधी आज शनिवार दि. ११ आक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता अमरधाम आनंदवाडी येथे होणार आहे. शेतकरी शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी माऊली बोडखे यांचे ते चुलते आहेत. त्यांच्यापठीमागे पत्नी,दोन मुले , सौ.रतन तुकाराम नन्नवरे ही मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या