Ticker

6/recent/ticker-posts

हसतमुख चेहरा अन् दमदार शब्दांचा " झुंजार योद्धा!"

आष्टी (प्रतिनिधी) एकदा ध्येयवादी माणूस आपल्या ध्येयाने भारून जातो तेव्हा तो त्या ध्येयासाठी आपले सारे जीवन झोकून देतो.रक्ताचे पाणी करून रात्रंदिवस कष्ट करून सर्वसामान्यांसाठी आपली लेखणी झिजवून अत्यंत सकारात्मक तसेच उत्स्फूर्त आत्मविश्वासातून नवी सामाजिक क्रांतीकारी कार्य करण्याच्या हेतूने एक नव्हे दोन वर्षे नव्हे तर अनेक दशके निरंतर, अव्याहतपणे त्या दिशेने चालणारा एक झुंजार विचारांचा,दमदार शब्दांचा आणि हसतमुख चेहऱ्याचा योद्धा म्हणजे उत्तम बोडखे या अनुषंगाने यांच्याकडे पाहिले जाते! इतरांनाही प्रेरणा मिळावी.. जगण्यासाठी आत्मविश्वास मिळावा.. अशी त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाची छाप आता सर्व सहका-यांवर पडावी अशी स्थिती आहे.उत्तम बोडखे हे गेल्या साडेतीन दशकाच्या काळातील एक पूर्णवेळ " पत्रकार " आहेत. राजकीय, सामाजिक, धार्मिक, वैचारिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक आदीसह विविध क्षेत्रांमध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून समता,बंधुत्व,ऐक्य सर्व धर्म सम भाव या मूल्यांची जोपासना व्हावी म्हणून सतत धडपडणारा अशी त्यांची ओळख आहे. सर्व क्षेत्रातील विविध पक्षाची नेते, अध्यात्मक क्षेत्रातील महाराज मंडळी, विचारवंत तसेच शिक्षण तज्ञ या सर्वांशी त्यांचे स्नेहाचे नाते आहे.आज त्याचा वर्षांपूर्वीचा एका कार्यक्रमातील मार्गदर्शन करतानाचा फोटो त्यांच्या " स्टेटस " च्या माध्यमातून त्यांच्या अनेक वाचकांच्या दृष्टीस आला.त्यास अनेक जणांनी ' उत्तम ' म्हणून प्रतिसाद दिला.अनेकांनी कौतुक केले; तर अनेकांनी त्यांना भ्रमणध्वनी वरून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या... -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या