आष्टी (प्रतिनिधी)
दि. 24/09/25 बुधवार रोजी नूतन महाविद्यालय येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन सप्ताह
निमित्त ‘ राष्ट्रीय सेवा योजना दिन ’ राष्ट्रीय सेवा योजना गीताचे सामूहिक गायन करून साजरा करण्यात आला.
तसेच यानिमित्ताने आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ‘जालना ब्लड बँक जालना ', राष्ट्रीय
सेवा योजना विभाग व हेल्थ क्लब नूतन महाविद्यालय, सेलू यांच्या वतीने संपन्न झाले. त्याप्रसंगी महाविद्यालयाचे
प्रभारी प्राचार्य
डॉ. आर.एम.खाडप, उप-प्राचार्य डॉ. महेंद्र शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना संयोजक डॉ.सुरेश उगले,सहकार्यक्रम
अधिकारी डॉ. कीर्ती निराळवाड, हेल्थ क्लब चे संयोजक डॉ.कमलाकर कदम तसेच महाविद्यालयातील
सर्व प्राध्यापक वृंद, व गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी या शिबिरास
उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. शिबिर समारोपानंतर जालना ब्लड बँक च्या वतीने प्राचार्य नूतन महाविद्यालय,
सेलू राष्ट्रीय सेवा योजना विभाग व हेल्थ क्लब यांचा या कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
0 टिप्पण्या