
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील क-हेवडगाव गावाच्या शिवारात असलेल्या मोठ्या
तलावाखाली असलेल्या नागरगोजेवस्ती ते अ.नगर ते बीड राज्य महामार्गापर्यत सरपंच
परिवंत गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वखर्चाने आडीच कि.मि.रस्ता दुरूस्त
केला आहे. हा रस्ता नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने पूर्णपणे खराब व खड्डेमय झाला
होता.शासकीय निधी उपलब्ध होण्याची वाट न पाहता आ.सुरेश धस यांच्या आदेशाने हा आडीच
कि.मि.चा रस्ता खडी व मुरुम टाकुन दुरुत केला आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थी,दुध
उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ यांची वाहतुकीची सोय झाली आहे.सरपंच परिवंत गायकवाड
यांच्या या तात्काळ केलेल्या रस्ता दुरुस्ती कामाचे कौतुक होत आहे.यापुर्वी
नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटप,रक्तदान शिबीरे,शालेय विद्यार्थीना गणवेश व शालेय
साहित्य वाटप व नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर येथुन आणण्यात येणाऱ्या ज्योतसाठी
क-हेवडगाव येथील युवकांना आर्थिक मदत केली आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात सरपंच
परिवंत गायकवाड यांचा मोठा पुढाकार व अर्थसहाय्य असते.ग्रामविकास करीत ते घरकुल
योजना,शेततळे, जलसिंचन विहीरी,पांदण रस्ते,वस्तीरस्ते आदि वैयक्तिक लाभाच्या
जास्तीजास्त योजना ते वैयक्तिक लक्ष देऊन राबवितात.याशिवाय क-हेवडगाव येथील
जि.प.प्रा. शाळेला २५ लाख रु.सरंक्षण भिंत बांधकाम, नागरगोजेवस्ती येथील
जि.प.प्रा.वस्ती शाळेसही २५ लाख रु.चे सरंक्षण भिंत बांधकाम मंजुर केले आहे.या ५०
लाख रु च्या निधी मंजुरीसाठी लोकप्रिय आ.सुरेश धस यांचे मोठे सहकार्य लाभलेले आहे
असे सरपंच परिवंत गायकवाड यांनी सांगितले.विविध विकास योजना दर्जेदारपणे
राबविल्याने ग्रामपंचायत सदस्य जालींदर हौसराव खांडवे,आप्पासाहेब नागरगोजे,शुभम
खांडवे,अशोक विधाते,अर्जुन बांगर,सुग्रीव नागरगोजे व क-हेवडगाव ग्रामस्थांनी सरपंच
परिवंत गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे.या गावातील युवक वर्गही सरपंच परिवंत
गायकवाड यांच्यावर खुष आहेत.
---------------
0 टिप्पण्या