Ticker

6/recent/ticker-posts

कर्म सेवामय झाले, की जीवन सुगंधित होते ....... अर्जुन घुगे,किशोर पवार

आष्टी (प्रतिनिधी) जसे श्वास घेऊन जगतो; तसे ध्यास घेऊन जगले पाहिजे. जग सुधारण्यापेक्षा त्याची सुरुवात स्वतःपासून करावी असे सांगत कर्म सेवामय झाले की जीवन आपोआप सुगंधी होते असे विचार शेवगाव तालुका शिक्षक संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते माननीय अर्जुन घुगे सर आणि कला शिक्षक किशोर पवार सर यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्यातील सामाजिक धार्मिक वैचारिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील गुणी व्यक्तिमत्व ज्येष्ठ निवेदक सूत्रसंचालक प्रा.बिभिषण चाटे सर यांना नुकताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने महाविद्यालयीन स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आदर्श शिक्षक देवेंद्र बोडखे, हिंदी साहित्य क्षेत्रातील अभ्यासक, शिक्षिका श्रीमती आशा चाटे-फड, माजी मुख्याध्यापक शेळके,सार्थक चाटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. ज्येष्ठ कला शिक्षक किशोर पवार सर पुढे म्हणाले, "जो काळानुसार बदलतो तो नेहमी प्रगती करतो. पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतील पाणी पोहऱ्यात येत नाही. कर्तव्य आणि कार्याबरोबरच नम्रता हा सरांचा दागिना आहे. वाचनाने माणूस समृद्ध बनतो, असेही ते म्हणाले. चौकट -------- बीड जिल्हा पत्रकार संघाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक! ----------------- अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या तीन दशक भर निरंतर कर्तव्य सेवेबद्दल महाविद्यालयीन स्तरावरा वरील यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा.बिभीषण चाटे सरांना जाहीर झाला. ही आनंदाची बाब असून बीड जिल्हा पत्रकार संघाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याची भावना यावेळी जेष्ठ शिक्षक देवेंद्र बोडखे यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या