Ticker

6/recent/ticker-posts

कडा (महेश) सह.साखर कारखाना सुरु होण्याची प्रतीक्षा ; ऊसाचे प्रमाण भरपुर ; अनेकांना रोजगारही उपलब्ध होईल

आष्टी ( प्रतिनिधी ) आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना आता कडा सहकारी साखर कारखाना पूर्ववत केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा आहे.कडा सहकारी साखर कारखाना २०१३ पासून बंद आहे.२०१८ मध्ये विद्यमान संचालक मंडळांनी हा सहकारी साखर कारखाना शिखर बँकेकडून भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्याचा प्रयत्न देखील केला होता.मात्र गाळप परवानगी अभावी साखर कारखाना सुरू होऊ शकला नाही.आता पुन्हा एकदा हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत . कारखाना परिसरातील स्वच्छता कामास वेग आला असून कामगार निवास आणि विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.गाळपाचा परवाना मिळाला तर यंत्रसामग्री दुरुस्ती करून लवकरात लवकर साखर कारखाना सुरू करण्याचा मानस आहे.कडा कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचे देखील हा कारखाना केव्हा सुरू होणार याकडे लक्ष लागलेले आहे. हा साखर कारखाना सुरू झाला तर अनेकांना रोजगार उपलब्ध होईल. त्याचबरोबर आष्टी मतदारसंघातील एक महत्त्वाची सहकारी संस्था नव्या उमेदीने कार्यरत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या