उत्तम बोडखे,आष्टी
----------------
आष्टी तालुक्यात धानोरा, कडा येथील पुलावरून
नदीचे पाणी वाहत असल्याने वाहतूक सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ४ पर्यंत बंद होती.
कडा, शेरी,टाकळी या ठिकाणी पुरात अडकलेल्या लोकांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका
करण्यात आली. कडा येथील अमोलक शिक्षण संस्थेच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरण्याची सोय
करण्यात आली होती.विविध ठिकाणी सुटका करण्यात आलेले नागरिक यांना हेलिकॉप्टर द्वारे
कडा येथे आणून प्राथमिक उपचारासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात
आले.आ.सुरेश धस हे मदतीचे ठिकाणी स्वतः उपस्थित होते.माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ.
साहेबराव दरेकर,अजय धोंडे, जयदत्त धस यांनी कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात
पूरग्रस्तांची जाऊन भेट घेतली . तर भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी
खिचडी तयार करून पुरातून सुटका झालेल्या तसेच कडा येथे पुराचा फटका बसलेल्या
नागरिकांच्या जेवणाची सोय केली.त्याचप्रमाणे कडा येथील हेलीपॅडवर मदत करणाऱ्या
कर्मचाऱ्यांना देखील खिचडीचे वाटप केले.डॉ.उमेश गांधी यांनी रुग्णांना शासकीय
रुग्णालयात नेण्यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. महावीर गुगळे यांनी
हे रुग्णवाहिका चालवून नागरिकांना उपचार मिळवून दिले तर कडा येथील प्राथमिक आरोग्य
केंद्रात डॉ.प्रियंका शिंगण आणि डॉ. पवार मॅडम यांनी उपचार केले.
-----------
शेकडो
विहीरी बुजल्या..
---------------
शेकडो विहिरी बुजून गेल्या आहेत.शेती वाहुन गेली.
फळबागा वाहुन गेल्या.मोठमोठी झाडे वाहुन गेले.पिके वाहुन गेली.. अतोनात नुकसान
झालेले आहे असे यावेळी असंख्य शेतकऱ्यांनी सांगितले. ----------------- आ.धस यांनी
घेतली सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक -----------------
आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत आपत्ती व्यवस्थापन बैठक घेऊन तात्काळ
झालेल्या नुकसानीचे पंचनामे तसेच छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे झालेले नुकसान
याबाबत सूचना करत सगळ्या यंत्रांना बोललेले प्रत्येक मंडळ आले. पंचनामे तात्काळ
करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी वसीमा शेख,तहसीलदार वैशाली
पाटील यांच्यासह सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. -------------- काल
झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर आल्याने आष्टी तालुक्यातील कडा,सुलेमान देवळा,
पिंपरखेड, धानोरा,शिरापुर,टाकळी अमिया आणि डोंगरगण या गावांचा संपर्क तुटला आहे.
कडा गावातील ११ नागरिक तर सुलेमान देवळा ६, पिंपरखेड ३, धानोरा ३, डोंगरगण
३,शिरापुर १० व टाकळी अमिया १५ असे एकूण सात गावात ५१ लोक अडकलेले आहेत.यासाठी
एनडीआरएफ पथकाला पाचारण केले आहे. एयरलिफ्टिंगची व्यवस्था जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणकडुन जिल्हाधिकारी यांचे प्रयत्नांनी करण्यात आलेली आहे.एअर फोर्सच्या
माध्यमातून पूर बाधित गावांतील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू
आहे. जिल्हाधिकारी यांनी सैन्यदल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांचे माध्यमातून
बचाव कार्य सुरू केलेले आहे. पालकमंत्री ना.अजित पवार यांनी अतिवृष्टी,पूरबाधित
गावांतील नागरिकांना आवश्यक ते मदतकार्य तात्काळ करणेबाबत जिल्हाधिकारी यांना सूचित
केले आहे.त्यानुसार तात्काळ कार्यवाही स्थानिक पथक व शोध व बचाव पथकांच्या
माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष,मंत्रालय नियंत्रण कक्ष,
एनडीआरएफ, आर्मी,विभागीय नियंत्रण कक्ष यांचे सोबत समन्वय स्थापन करण्यात येत असून
स्थानिक तहसीलदार,उपविभागीय अधिकारी यांचे सोबत जिल्हाधिकारी स्वतः संपर्क ठेवून
आहेत. पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.पूरग्रस्त गावातील नागरिकांनी घाबरू नये
आणि प्रशासनास सहकार्य करावे. जिल्हाधिकारी यांचेमार्फत सर्वांशी समन्वय साधून
आवश्यक ठिकाणी मदत पाठवण्यासंदर्भात व बचाव कार्य करण्याची कार्यवाही करण्यात येत
आहे.आ.सुरेश धस हे प्रत्यक्ष घटनास्थळावर उपस्थित होते. तहसीलदार वैशाली पाटील व
उपविभागीय अधिकारी यांचे मदतीत प्रत्यक्ष पूरबाधित क्षेत्रात मदत कार्य सुरू आहे.
------------------
अतिवृष्टीमुळे नागरिक अडचणीत; माजी आ.
भीमराव धोंडे यांनी
पूरग्रस्त भागांना दिल्या तातडीने भेटी
----------------
गेल्या २४ तासांपासून
झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे आष्टी तालुक्यातील अनेक भागात पाण्याचा मोठा प्रकोप
झाला आहे.ढगफुटीच्या स्वरूपात झालेल्या पावसामुळे नाले- ओढ्यांना पूर आला आहे. अनेक
ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत.या परिस्थितीची दखल घेत माजी आ.भीमराव धोंडे यांनी
आष्टी तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. त्यांनी प्रत्यक्ष
परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून
घेतल्या.यावेळी माजी आ.धोंडे यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी
श्रीमती वसीमा शेख व तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क
हेलीकाप्टर तातडीने पाठविण्याची मागणी केली आहे.साधत तातडीने मदत कार्य सुरू
करण्याच्या सूचना दिल्या.नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आवश्यक ती सर्व
उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला
दिल्या.नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून मदत कार्याला वेग
देण्यात येत आहे.नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी सहकार्य करावे असे आवाहन माजी
आ.भीमराव धोंडे यांनी केले.
------------
महापुरात अडकलेल्या ५० लोकांना
हेलीकॕप्टरने काढण्याचे कार्य सुरु आहे.पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या
सतर्कतेने हेलीकाॕप्टर दाखल झाले आहे. -------------- १० तास अडकलेल्या नागरीकांना
बाहेर काढले....
-----------------
आष्टी तालुक्यातील दौलावडगांव परिसरात सोमवारी
पहाटे ढगफुटी झाल्याने कडा शहरात नदीचे पाणि शिरले.यामध्ये कडा शहरातील एकाच
कुटुंबातील गोविंद सापते,योगेश सापते, असराबाई सापते,मीनाबाई सापते,सुषमा
सापते,आर्या सापते,काजल सापते,कृष्णा ससे,अमोल बेदरे,आकाश बेदरे, सुमन बेदरे तर
शेरी खुर्द येथील महेश ढोबळे,विजय ढोबळे, प्रिती महेश ढोबळे,सुर्वणा विजय ढोबळे,
राजदीप विजय ढोबळे, गयाबाई रामदास ढोबळे आणि टाकळी अमिया येथील शिवाजी दगडू महानवर,
शकुंतला शिवाजी महानवर, साईनाथ नवनाथ महानवर, पारूबाई दगडू महानवर, शुभांगी नवनाथ
महानवर यांना १० तासांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने हॅलीकॅप्टरने सुरक्षित
बाहेर काढले.५० वर्षानंतर पहिल्यांदाच कडी नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुर आला
आहे.याचे कारण आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवर वर पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी,
बोरसेवाडी, आलनवाडी या भागात रविवारी मध्यरात्री ढगफुटी झाली.आष्टी तालुक्यातही
दौलावडगांव परिसरात अतिवृष्टी झाली.परिणामी कडी नदीला पहाटेपासून पाणि वाढत चालले
सकाळी ८ वा.च्या सुमारास तर कडा शहरात पाणि घुसले, यावर सकाळपासुनच आ.सुरेश धस,
तहसिलदार वैशाली पाटील,माजी आ. भीमराव धोंडे व माजी आ.साहेबराव दरेकर,सरपंच युवराज
पाटील, सुनिल नाथ,यशवंत खंडागळे,ठकाराम दुधावडे,ज्ञानेश्वर चौधरी, ग्रामसेवक
बाळासाहेब थोरवे, मजी सरपंच अनिलतात्या ढोबळे,सभापती रमजान तांबोळी यांच्यासह सर्व
अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.कडा येथे आल्यानंतर आ.धस यांना तालुक्यात विविध
ठिकाणी पुरामध्ये ४४ जण अडकले आहेत असे तहसिलदार यांनी सांगितले. दुपारी १२ नंतर या
पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी गतीने चक्रे फिरली आणि आ.धस यांनी
अहिल्यानगर येथील मिलेट्रीचे हॅलीकॅप्टर बोलवून या पथकाने २ वाजता आडकलेल्या
लोकांना आणण्यासाठी गेले घटनास्थळी २.२० मि.नी पोहचले २.४० वा.त्यांना सुखरूप बाहेर
काढले.यावेळी आ.सुरेश धस, उपविभागीय अधिकारी वसिमा शेख,तहसिलदार वैशाली पाटील
यांच्यासह नागरीक मोठ्या संखेने घटनास्थळी होते.
-------------------
चौकट
-----------
२४ तासांपासून आष्टी तालुक्यातील विविध ठिकाणी ढगफुटीसह अतिवृष्टी
झाल्याने पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.या अतिवृष्टीमुळे धामणगाव
येथील अफरोज बशीर शेख बागवान (वय ३५ वर्षे) हा तरुण सकाळी धामणगावाच्या पुरामध्ये
वाहून गेला.या घटनेची माहिती मिळताच माजी आ.भीमराव धोंडे यांनी तत्काळ धामणगाव येथे
जाऊन निवासस्थानी भेट दिली.त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला.







-----------------
0 टिप्पण्या