Ticker

6/recent/ticker-posts

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी

आष्टी (प्रतिनिधी) एरंडगाव येथील एकनाथ माध्यमिक विद्यालयात भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव, राष्ट्रनिष्ठ विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या एकात्म मानववादाच्या विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजलीने झाली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव काटे , शिक्षक प्रकाश दहिफळे, कैलास नजन, नवनाथ कदम, अर्जुन घुगे, मुकुंद आरे, देवेंद्र बोडखे,श्रीमती विद्या भागवत, किशोर गोर्डे, दराडे सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. गुजर मामा, काळे मामा, समद शेख उपस्थित होते.मुख्याध्यापक काटे सर यांनी आपल्या भाषणात पंडितजींच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, दीनदयाळ उपाध्याय हे एक विचारवंत, संघटक आणि राष्ट्रभक्त होते. त्यांनी ‘एकात्म मानववाद’ ही जीवनदृष्टी मांडली, ज्यामध्ये भारतीय संस्कृती, गरिबांचे कल्याण आणि सर्वांगीण विकास यांचा समावेश आहे.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६ रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात झाला. त्यांनी भारतीय राजकारणात मूल्याधिष्ठित विचारांची पायाभरणी केली. भारतीय जनसंघाचे ते राष्ट्रीय सचिव होते आणि त्यांनी संघटनात्मक बांधणीसाठी आयुष्य वाहिले. १९६८ मध्ये त्यांचे निधन झाले, परंतु त्यांच्या विचारधारेचा प्रभाव आजही देशभर आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी पंडितजींच्या विचारांवर आधारित घोषवाक्ये सादर केली. उपस्थित शिक्षक
व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून राष्ट्रसेवेचा वसा चालवण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या