आष्टी (प्रतिनिधी)
करवीर तालुक्यातील विकास विद्या मंदिर या शाळेचे शिक्षक तथा बीड
जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील वारणीचे भुमीपुत्र रविंद्र मनोहर केदार यांना राज्य
शासनाचा 'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक' पुरस्कार जाहीर झाला
आहे. शिक्षणक्षेत्रात दिलेल्या नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याचा सन्मान
करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर शिक्षकदिनी हा पुरस्कार शासनाच्या वतीने दिला
जातो.या पुरस्काराचे स्वरूप १ लाख १० हजार रु.चा धनादेश स्मृतीचिन्ह,शाल फेटा असे
आहे.रविंद्र केदार यांना राज्यशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शाळेत 'स्मार्ट
टू ग्लोबल क्लासरूम' व 'स्मार्ट ट्र ग्लोबल स्कूल' या महत्वाकांक्षी व अभिनव
संकल्पना राबवल्या.यामुळे या शाळेचा संपूर्ण कायापालट झाला. त्यांनी राबवलेल्या
'स्मार्ट टू ग्लोबल स्कूल' उपक्रमाला राज्यशासनाच्या वतीने घेतल्या गेलेल्या 'राजीव
गांधी गतिमान प्रशासन अभियान' यामध्ये सर्वोत्तम कल्पना म्हणून प्रथम क्रमांक
प्राप्त झाला आहे.त्यांनी आपल्या शाळेत राबवलेल्या बियाँड बॉर्डर,ऑनलाइन ग्रेट भेट
या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विविध देशातील विद्यार्थी,शिक्षक व
मान्यवरांच्या भेटी घडवून आणल्या. यासोबतच विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक दिवाळी
साजरी करण्यास प्रोत्साहित करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा परिपोष व्हावा
यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.त्यांनी कोरोना काळात वर्गात लोकसहभागातून 'स्मार्ट
टू ग्लोबल क्लासरूम' हा उपक्रन राबवला.या उपक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यासह
राज्यभरातील शिक्षणप्रेमींचा प्रतिसाद मिळाला.ज्यामुळे 'स्मार्ट टू ग्लोबल स्कूल'
हा उपक्रम देखील पूर्ण होण्यास मदत मिळाली.केदार यांनी राबवलेल्या विविध
नाविन्यपुर्ण उपक्रमांची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली व
'स्मार्ट टू ग्लोबल स्कूल' हा उपक्रन पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या
वतीने ३४ लक्ष रुपयांचा निधी दिला.यामुळे शाळेत ग्रंथालय,आयसीटी लॅब,सायन्स लॅब,
प्रत्येक वर्गात इन्ट्रॅक्ट पैनल,स्मर्ट स्पीकर इत्यादी सुविधा प्राप्त झाल्या.
यामुळे शाळा देशातील पहिली सरकारी मोबल स्कूल बनली. यामुळे सर्वसामान्य रुटुंबातील
लेकरांना राष्ट्रीय शिक्षण मिळण्याचा प्रवास सोपा झाला.त्यांनी विद्यार्थ्यांना
विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले सामुळे अनेक विद्यार्थ्यांना या
परिक्षांत या देखील मिळाले आहे.त्यांनी बालरक्षक म्हणून कार्य करताना शाळेच्या
परिसरात असलेल्या वीटभट्टी कामगारांच्या व झोपडपट्टीतील अनेक बालकांना शिक्षणाच्या
प्रवाहात आणले आहे.केदार हे सद्या राज्य बालचित्रपट समितीच्या सदस्यपदी कार्यरत
आहेत.त्यांनी राज्यस्तरावर विविध प्रशिक्षणात तज्ज्ञ शिक्षक म्हणून काम पाहिले
आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने तयार झालेल्या 'आनंददायी अभ्यासक्रम'
निर्मितीमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा
त्यांचे प्रवास स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम' चा हे पुस्तक देखील प्रकाशित झाले
आहे.त्यांना कार्यात जिल्हाधिकारी पहल रेखावार, अमोल येडगे,मुख्य कार्यकारी अधिकारी
संजयसिंह चव्हाण, संतोष पाटील, कार्तिकेयन एस.शिक्षणाधिकारी डॉ.नीना शेंडन,
गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील,अर्चना पाथरे, शिक्षण विस्तार अधिकारी डी.
सी.कुंभार,रविंद्र ठोकळ, आनंदयव आकुर्डेकर,प्रकाश आंग्रे, केंद्रप्रमुख प्रतिभा
देसाई, हेमलता बनकर,मुख्याध्यापक अंबादास बडे,पत्नी विद्या केदार,शिक्षक वृंद व
पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.दि.२२ सप्टेंबरला मुंबईत एका कार्यक्रमात रविंद्र
केदार यांना मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा
पवार,उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,शिक्षणमंत्री ना.दादा भुसे,शिक्षण आयुक्त
सचिंद्र प्रताप सिंग यांच्या हस्ते गौरवले जाणार असल्याने केदार यांच्यावर सर्वत्र
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
------------------
चौकट
----------

रविंद्र केदार
यांनी राबवलेल्या 'स्मार्ट टू ग्लोबल स्कूल' या संकल्पनेला राज्यशासनाच्या सामान्य
प्रशासन विभागाच्या वतीने घेतलेल्या स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला
होता.दि.२२ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव सुजाता
सौनिक यांच्या हस्ते रविंद्र केदार यांचा गौरव झाला होता. आता शिक्षण विभागाने
त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना सावित्रीमाई फुले
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला असल्याने त्यांचा एकाच वर्षी
दुसऱ्यांदा शासनाच्यावतीने गौरव होत आहे.राज्यशासनाच्या वतीने पुरस्कार जाहीर
झाल्यामुळे गेल्या १४ वर्ष निष्टेने व सचोटीने केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल
शासनाने घेतल्यामुळे कार्यास आणखी पाठबळ मिळाले आहे. माझ्या कार्यास पाठबळ देणाऱ्या
प्रत्येकाचे आभार...
---- रवींद्र केदार,
(राज्य आदर्श शिक्षक
पुरस्कार जाहीर
शिक्षक,प्राथमिक शिक्षक विद्या
मंदिर सरनोबतवाडी,ता.करवीर जि.कोल्हापूर
------------------
0 टिप्पण्या