आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र लोकसेवा गट ब परीक्षेत आष्टीचा डंका वाजला असुन निखिल
रमाकांत हंबर्डे हा राज्यातून दुसरा आला आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी,राज्य कर
निरीक्षकपदी निवड झाली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) नुकत्याच जाहीर
झालेल्या निकालात आष्टी येथील सुपुत्र निखिल पुष्पा रमाकांत हंबर्डे यांनी
दैदिप्यमान यश मिळवले आहे. त्यांनी सहाय्यक कक्ष अधिकारी (मंत्रालय) आणि राज्य कर
निरीक्षक या दोन्ही अत्यंत प्रतिष्ठेच्या पदांसाठीच्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्र
राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. निखिल हा आष्टी येथील जिल्हा परिषद लघु
पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता रमाकांत हंबर्डे यांचे चिरंजीव
आहेत तर साप्ताहिक 'आष्टी चित्रदर्शन'चे संपादक अनंत हंबर्डे यांचे नातू आहेत. एका
अभ्यासू आणि प्रतिष्ठित घराण्याचा वारसा त्यांनी आपल्या कर्तृत्वाने पुढे नेला आहे.
निखिलच्या या नेत्रदीपक यशामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.निखीलच्या
या यशाबद्दल सर्व नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील सर्व स्तरांतून अभिनंदनाचा
वर्षाव होत आहे. निखलच्या या यशाबद्दल आ.सुरेश धस,माजी आ. साहेबराव दरेकर, जेष्ठ
पत्रकार अनंत हंबर्डे यांनी निखिल यांचे अभिनंदन केले आहे.निखिलने मिळवलेले हे यश
ग्रामीण भागातील इतर तरुणांसाठी एक मोठे प्रेरणास्थान ठरले आहे.महाराष्ट्र लोकसेवा
गट ब परीक्षेत निखील राज्यात व्दितीय आला आहे. निखीलचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा.
शाळा आष्टी,५ वी.ते १० वी.पर्यत पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालयात नंतर लातुर येथील
दयानंद महाविद्यालयात ११ वी.व १२ वी.पर्यंत शिक्षण घेतले आहे.बारावीला ९५ टक्के गुण
मिळवुन विशेष यश प्राप्त केले होते.पुणे येथील सीओईपी इंजिनियरींग काॕलेजमधुन
इंजिनियरींग पदवी मिळवली होती.दोन वर्षे इमरसन्स कंपनीत जाॕब केला आहे. दरम्यान ही
महाराष्ट्र लोकसेवा गट " ब " परीक्षा दिली होती, या परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन
राज्यात व्दितीय क्रमांक पटकावला आहे.निखीलच्या या यशाबद्दल नातेवाईक व
मित्रपरिवाराकडुन अभिनंदन होत आहे.
"

-----------------
0 टिप्पण्या