Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अतोनात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची रक्कम दुप्पट वाढ करावी ..... माजी आ.भीमराव धोंडे

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांनीचे अतोनात नुकसान झाले आहे. नागरीकांचे घरे पाण्याखाली गेली.जनावरे दगावली,२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमिनी वाहुन गेल्या आहेत. तात्काळ पंचनामे करून तातडीची मदत द्या.या पावसाने अतोनात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाईत दुप्पट वाढ करावी असे निवेदन माजी आ.भीमराव धोंडे यांनी दिले. आष्टीच्या तहसिलदार वैशाली पाटील यांना लेखी निवेदन देऊन आष्टी तालुक्यातील नुकसानीची माहिती दिली. नुकसानीचा मिळणारा मावेजा दुप्पट करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.विविध नुकसान ग्रस्तांना सोबत घेऊन तातडीने प्रश्न सोडवा अशा सुचना देखील धोंडे यांनी दिल्या आहेत.शुक्रवारी माजी आ.भीमराव धोंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन तहसिलदार वैशाली पाटील यांची भेट घेतली.तातडीने त्यांचे प्रश्न सोडविण्यास सांगितले.यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,आष्टी तालुक्यातील सर्व मंडळामध्ये अतीवृष्टी झाली आहे.त्यामध्ये दौलावडगाव, दादेगाव,धानोरा, कडा,धामणगांव, डोईठाण व पिंपळा या मंडळामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी पूराच्या पाण्यामुळे खरडून गेलेल्या आहेत. अनेक विहीरी व बोरवेल बूजून गेलेले आहेत.जीवीत हानी व घरांचे दुकानांचे तसेच शेतातील पिकांचे व फळबागांचे आतोनात नुकसान झाले असून त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून खासबाब म्हणून शासनामार्फत मिळणाऱ्या तातडीच्या तात्काळ आर्थिक मदतनिधी मध्ये पुरस्थिती पाहता दुपटीने वाढ करण्याबाबत वरिष्ठास कळवून तात्काळ अन्यधान्य, आर्थिक मदत व अत्यावश्यक ती मदत देण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. यावेळी नियामत बेग,अॕड रत्नदिप निकाळजे, रिपाइं तालुकाध्यक्ष अशोक साळवे, सतीषमामा झगडे, शिवाजी सुर्यवंशी, चंद्रशेखर साके, बाळासाहेब शेकडे, सरपंच संभाजी झांबरे,सरपंच दादासाहेब जगताप, रघुनाथ शिंदे,माजी सरपंच संजय नालकोल, सरपंच ज्ञानेश्वर वाघ, सरपंच भाऊसाहेब कोकरे,सरपंच अभय गर्जे,अस्ताक शेख,राजदीप निकाळजे,आदेश निमोणकर,युवराज खटके,सदाभाऊ दिंडे,बाबा ससाणे, मच्छिंद्र सदाफुले आदी कार्यकर्ते, नागरीक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या