
आष्टी (प्रतिनिधी)
भारतातील विधी क्षेत्रातील नंबर एक कॉलेज म्हणून सलग १५ वर्षे
नोंद असलेले बेंगलोर येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे.या काॕलेजमधुन आष्टीचे
सुपुत्र ॲड.ओंकार सुभाष रासकर यांना नुकतीच एलएलएम पदवी सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती मा.सूर्य कांत याच्या हस्ते प्रदान करण्यात आली आहे.३३ वा.पदवी दान
समारंभ, दि.७ सप्टेंबर २०२५ रोजी बँगलोर येथे पार पडला.ॲड. ओंकारने LLB (बॅचलर इन
लॉ) ही पदवी संपादन केली. न्यायमूर्ती मा.सूर्य कांत हे भारताचे सर्वोच्च न्यायाधीश
म्हणून शपथ घेणार आहेत. कायद्याच्या परीक्षेत अर्थात एलएलबी परीक्षेत अत्यंत
प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि प्रचंड अभ्यास करून ओंकार सुभाष रासकर यांने उत्तम यश
प्राप्त केले आहे.परीक्षा निकालां मधील यशाबद्दल त्याचे विविध क्षेत्रातील
मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.ओंकार सुभाष रासकर हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
तसेच पदवी स्तरावर हे एक अभ्यासू शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून ओळखला जातो.त्याने
बालपणातच वकील व्यवसाय करण्याचा मानस व्यक्त केला होता त्यानुसार त्यांच्या
वडिलांनी कायद्याच्या अभ्यासाच्या प्रवेशासाठी स्वतःला झोकून देत अखेर एलएलबीची
परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली होती.ॲड. ओंकार सुभाष रासकर यांना पदवी
मिळल्याबद्दल माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर, माजी सरपंच नामदेव
राऊत,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,विठ्ठलराव बन्सोडे, दत्ताभाऊ सायकड यांनी अभिनंदन
केले.
चौकट
------
बालपणामध्ये पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याने आणि भविष्यात
वकिली व्यवसायामध्ये पदार्पण करून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची आपण
भूमिका स्वीकारू असा विश्वास ओंकार रासकर यांनी व्यक्त केला.
----------------
0 टिप्पण्या