
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील प्रभात ग्रुप तसेच भरती पूर्व प्रशिक्षणासाठी सतत
व्यायाम, अभ्यास करणारी आणि आष्टी तालुक्यातील व परिसरातील विविध विभागातून
सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान
महाविद्यालयाच्या परिसरात आज उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या
स्वच्छता अभियानानंतर महाविद्यालय परिसर अत्यंत चकाचक झालेला पाहून उपस्थित या
मैदानावर व्यायाम करणाऱ्या नागरिकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. आष्टी येथील
भगवान कॉलेज प्रांगणामध्ये सकाळच्या प्रहरी मॉर्निंग वॉक, प्राणायाम करण्यासाठी
येणाऱ्या आर्य प्रभात ग्रुप व भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी सरावाकरिता येणाऱ्या
विद्यार्थी विद्यार्थिनी व माजी कृषी आयुक्त सुनीलदादा चव्हाण, ॲड.रत्नदीप निकाळजे,
योगगुरु सेवानिवृत्त प्रा.भा. दे.जगताप व माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण, आष्टी
तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे मोहन गलांडे,
इंजि.दत्तात्रय देशमुख,राजेंद्र धोंडे, नागेश कारंडे, बाबाजी अकॅडमीचे राहुल जाधव
सर या यांनी भगवान कॉलेज परिसरात बुधवारी स्वच्छता अभियान राबवले. यामध्ये
प्रांगणामधील गवत असेल कचरा असेल सर्व गोष्टीचा निचरा केला.सुनीलदादा चव्हाण हे
आपल्या जन्मभूमीत आष्टी गावांमध्ये यापूर्वी देखील त्यांनी आष्टी ग्रामीण
रुग्णालयातील परिसरामध्ये आर्य प्रभात ग्रुपच्या मदतीने स्वच्छता अभियान राबवले
होते.संत गाडगेबाबांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपले घर आपला परिसर
स्वच्छ ठेवला पाहिजे.स्वच्छता राखली पाहिजे असा संदेश उपस्थितांना सुनीलदादा चव्हाण
यांनी दिला. चौकट -------- संत गाडगेबाबांच्या कार्याची प्रेरणा!
------------------ आष्टी येथील भगवान महाविद्यालय हे शिक्षण क्षेत्रातील नामवंत
उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून सुप्रसिद्ध आहे.२० एकरात वसलेले हे महाविद्यालय युवक
जेष्ठ नागरिकांसाठीही मैदानात धावणे व व्यायामासाठी उपयोगात येते. भगवान
महाविद्यालयाच्या परिसरात आष्टी येथील प्रभात ग्रुप प्रशिक्षणार्थी युवक, आजी-माजी
अधिकारी ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या माध्यमातून राबवलेले हे स्वच्छता
अभियान माणुसकीचे मूल्य जपणारे आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या कार्याची प्रेरणा
घेऊन उचललेले हे पाऊल जिल्हाभरात रूजावे अशी अपेक्षा यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार
उत्तम बोडखे यांनी येथे व्यक्त केली. ----------------
0 टिप्पण्या