आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने मंगळावरी मोठ्या
थाटात गणरायला निरोप देण्यात आला.६० मुला मुलींच्या वारकरी टीमने टाळ मृदुंग आणि
हातात भगवी पताका घेऊन विठूरायाचा केलेला गजर,पारंपारिक वाद्याचा कानावर पडलेला
सुमधुर ध्वनीने आष्टीकरांना मंत्रमुग्ध केले.आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या
वतीने दरवर्षी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते.यंदाही असोसिएशनच्या वतीने गणरायाची
स्थापना करण्यात आली होती.गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात
येतो. आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथील ह.भ.प.अशोक महाराज भोसले यांच्या
शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ६० हून अधिक मुला मुलींच्या वारकरी वेश परिधान करून
विविध अभंगावर टाळ मृदुंगाचा केलेला गजर, शहरातील मुख्य चौकात भारुड,फुगडी
खेळण्याचा लुटलेला आनंद यामुळे समस्त आष्टीकरांचे लक्ष या भजनी पथकाकडे होते.
पारंपरिक पद्धतीच्या असलेल्या वाद्यामुळे या मिरवणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले
होते.दुपारी ४.वाजता गणरायाची विधिवत पूजा करून निरोप देण्यात आला. यावेळी
तालुक्यातील सर्व फोटोग्राफर सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या