Ticker

6/recent/ticker-posts

शांत,संयमी,शिक्षण संस्थाचालक माजी सभापती विजयकुमार बांदल (आण्णा)

स्वतःसाठी जगता जगत.इतरांसाठी सदैव जगणारा एक आदर्श व कृतिशील राजकारणी म्हणून माजी सभापती विजयकुमार बांदल यांची आष्टी तालुक्याला ओळख आहे.शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक, राजकीय,कला,नाट्य क्षेत्रातील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. माजी सभापती विजयकुमार बांदल म्हणजे मितभाषी, संयमी,अभ्यासू व्यक्तिमत्व, धोरणी राजकारणी आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षण संस्थाध्यक्ष अशी त्यांची प्रतिमा आहे. आष्टी तालुक्यातील त्यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे.त्यांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस. सामाजिक,शैक्षणिक उपक्रमातुन साजरा होत आहे. -------------- आष्टी तालुक्यातील धानोरा या छोट्याशा खेड्यागावात शेतकरी कुंटुंबात जन्म झालेले विजयकुमार बांदल. आष्टीचे शिक्षण महर्षि लोकनेते भीमराव धोंडे यांच्या समवेत ४० वर्षापासुन समाजकारण, राजकारण केले आहे. एक सामाजिक दृष्टिकोन असलेले नेते म्हणुन विजयकुमार बांदल यांच्याकडे पाहिले जाते. धोंडेसाहेब यांनी त्यांना राजकारणात तालुक्यातील मानाची पदे दिलेली आहेत. आष्टी पंचायत समितीचे सभापती,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केले.या तालुका पातळीवरील जबाबदारी दिल्या.त्यांनी राजकारण प्रमाणिकपणे व निष्ठेने केले.निष्ठा, तळमळ आणि कष्टाची तयारी यामुळे त्यांनी संधीचे सोने केले.मुलाने खऱ्या अर्थाने आपले शिक्षण पुर्ण करीत आणले की,भविष्याचा विचार सुरू होतो.कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले अनेक उच्च अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात.बाकीचे विद्यार्थी आपापल्या ईच्छेप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात पण बांदल हे राजकीय क्षेत्रांमध्ये जातील, शैक्षणिक गुणवत्ता वाढवत शैक्षणिक कार्य करतील असे वाटत नव्हते परंतु अगदी हृदयामध्ये,मनातल्या अंतर्मनात, शैक्षणिक कार्याची आवड असणारे आणि आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये शैक्षणिक क्षेत्राची परंपरा नसणा-या विजयकुमार बांदल यांनी आकाशाला गवसणी घातली. विजयकुमार बांदल यांचे विद्यार्थीची गुणवत्ता वाढीचे मोठे कार्य आहे.अनेक आदर्श विद्यार्थी त्यांच्या संस्थेने घडवले आहेत.स्नेह,आनंद, शांतता, ऐक्य भाव निर्माण करणे व सामाजिक समस्या दूर करण्याचे सतत त्यांनी काम केले आहे परंतु चंदनाप्रमाणे झिजणारा संस्थाध्यक्ष अशी त्यांची प्रतिमा आहे.आपल्या वाट्याला आलेले दुःख,वेदना, हालअपेष्टा हसतमुखाने झेलण्याची त्यांची तयारी असते.कोणालाही कोणतीही तक्रार, कुरकुर न करता सदैव चंदनाप्रमाणे झिजून आपला परिसर सुगंधित ठेवणे हेच त्यांना ठाऊक आहे. इतरांच्या सुखात सुख,दुःख,दुःख मानणारा एक सोज्वळ आणि हळव्या मनाचा राजकारणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षि शाहु महाराज, म.फुले,भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीच्या ध्येयवादाने भारलेले विजयकुमार बांदल आण्णा आहेत. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटलेल होतं.सर्वसामान्य कुटुंब असताना त्यात प्रतिकूल परिस्थितीत मात करीत शिक्षण घेतले.प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत,परिस्थितीशी जुळते घेत विजयकुमार बांदल यांनी शिक्षण घेतले.जिद्दीने शिक्षण घेणारे, कष्टाला न लाजणारे हे व्यक्तिमत्व आहे.मनाचे मोकळेपणा,जे पोटात तेच ओठात,शांत स्वभाव आणि सतत ज्ञान घेण्याच्या भूमिकेत जगणारे माजी सभापती बांदलसाहेब.... सामाजिक कार्याच्या आवडीतून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबविलेले आहेत.शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली.दत्तक पालक योजना राबवली. वृक्षारोपण,बचत आदी राष्ट्रीय कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे.समाज सहभागातून दीनदुबळ्यांना त्यांनी मदत मिळवून दिली आहे.कला,क्रीडा,कृषी,साहित्य, आरोग्य,शैक्षणिक क्षेत्राचा चौफेर अभ्यास असणारे बांदल हे आदर्श संस्थाध्यक्ष आहेत. आज त्यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात समाज कसा असावा याचा विचार तत्कालीन काहीच लोकांनी केला त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे माजी सभापती विजयकुमार बांदल उर्फ अण्णा होय.सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विजयकुमार धोंडीराम बांदल यांनी आपले वडील अहिल्यानगरमध्ये एका व्यापाऱ्याकडे नोकरी करताना होत असलेल्या हालअपेष्टा जवळून पहिल्या आणि तेंव्हापासूनच ठरविले की, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे तरच त्यांची आर्थिक प्रगती होईल.भारताला प्रजासत्ताक गणराज्याच्या दर्जा मिळाला तेंव्हा विजकुमार बांदल यांचा जन्म झाला. बालपणीच अहिल्यानगर हातोळण,धानोरा असा त्यांचा जीवन प्रवास सुरु झाला. परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जि.प.प्राथमिक शाळा हातोळण येथे केले.त्यानंतर पुढच्या प्राथमिक शिक्षणासाठी ते जि.प.धानोरा येथे आले.आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.स्वतःचे शिक्षण घेता घेता समाजाचे शिक्षण झालं पाहिजे. समाजाला यामधून फायदा झाला पाहिजे आणि समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे याच दृष्टिकोनातून धानोरा येथे त्यांचे वडील कै.धोंडीराम बांदल यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत जनता वसतिगृह सुरु केले.वडिलांचे शिक्षणाचे हे काम त्यांनी बालवयातच जवळून पहिले.आज या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.या वटवृक्षांमध्ये माजी सभापती विजयकुमार बांदल यांचा सिंहाचा वाटा आहे.माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बीड येथील बलभीम महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.सहाजिकच समाजकार्याची आणि राजकारणाची आवड असल्यामुळे त्यांनी अहिल्यानगर येथील अहमदनगर कॉलेजमधील डीएसडब्ल्यू म्हणजेच समाजकार्य पदविका यासाठी प्रवेश घेतला.हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई येथे इंटरनॅशनल कौन्सिल ऑन सोशल वेल्फेअर या संस्थेमध्ये एक वर्ष नोकरी केली.ग्रामीण भागातील विद्यार्थी नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे गेल्यानंतर तिथे ते फार काळ रमले नाहीत. मुळताच समाजकार्याचा आणि राजकारणाचा पिंड असलेले विजयकुमार बांदल यांनी नोकरी सोडून गावाकडे म्हणजेच धानोरा येथे येण्याची ठरवले.नोकरी करत असताना त्यांना कडा येथील सहकारी साखर कारखान्यात एक वर्षाची नोकरी करण्याची संधी मिळाली.या नोकरीच्या कालावधीमध्ये त्यांनी आष्टी तालुक्यातील राजकारणाचा जवळून अभ्यास केला.तत्कालीन आमदार,खासदार आणि सहकारी क्षेत्रातील अभ्यासू यांच्याबरोबर कार्य करत त्यांना या सगळ्या गोष्टींचा चांगला फायदा झाला. कडा सहकारी साखर कारखान्यात एक वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी या नोकरीचा त्याग केला आणि थेट राजकारणात प्रवेश केला.सुरुवातीला कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद त्यांनी १९८७ ते १९९७ या १० वर्षाच्या कालावधीमध्ये भूषविले.कडा कृषी उत्पन्न बाजार समिती आज नावारूपाला आली आहे.या बाजार समितीच्या नावारुपाला येण्याच्या मागे विजयकुमार बांदल यांचेही श्रेय आहे. त्याकाळामध्ये शेतकऱ्यांना पूरक अशा प्रकारच्या ध्येय धोरणाचा अवलंब त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत केला. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार भाव मिळाला पाहिजे.त्याचबरोबर शेतकऱ्यांची उत्पन्न कसं वाढेल यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले.याच दरम्यान १९९२ ते १९९७ त्यांनी आष्टी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले.पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील विविध समस्यांवर लक्ष द्यायला सुरुवात केली. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सुविधा कशा प्राप्त होतील याचा त्यांनी विचार केला.त्याचबरोबर शिक्षकांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न केला.आष्टी पंचायत समिती सभापती असताना दरम्यानच्या काळात आपल्या वडिलांच्या शिक्षण कार्याची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली.धानोरा येथे त्या काळामध्ये शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या होत्या आणि गावांमध्ये फक्त जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आणि जनता विद्यालय होते. वडिलांचा शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी ते सन २००१ मध्ये जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे सचिव झाले.ते सचिव झाल्यानंतर या संस्थेची भरभराट मोठ्या प्रमाणात सुरू झाली.संस्थेच्या अनेक शाखा सुरू झाल्या. यामध्ये जनता विद्यालयाचे विस्तारीकरण, उच्च माध्यमिक विद्यालय,वरिष्ठ महाविद्यालय,रोडेश्वर विद्यालय, हिवरा पिंपरखेड आणि जॅकॲन्डजिल स्कूल या सर्व शिक्षण संस्थांचा समावेश आहे.आज या शिक्षण संस्थांमध्ये २५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी आणि त्यांचे भवितव्य उज्वल व्हावे याच दृष्टिकोनातून या संस्थेची पायाभरणी झाली आणि हाच हेतू पुढे ठेवून विजयकुमार बांदल यांनी आपली वाटचाल सुरू केली. आज ते वयाची ७४ वर्षे पूर्ण करत आहेत. आजही तितक्याच जोमाने, तितक्याच उत्साहाने ते या शिक्षण संस्थाची धुरा सांभाळत आहेत.शिक्षण संस्था चालवत असताना समाजकारण, राजकारण संस्थेमध्ये असलेली विविध नोकर कर्मचारी या सर्वांशी समन्वय साधून आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी कशा उपलब्ध होतील यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न करत आहेत.या उज्ज्वल कार्यात त्यांना संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांचा मित्रपरिवार ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळत आहे. अशा या दिलखुलास नगर्वी शांत,संयमी, कलावंत,अभ्यासु राजकारणी माजी सभापती विजयकुमार बांदल यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा .... लेखक ------------ उत्तम बोडखे,आष्टी. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या