

आष्टी (प्रतिनिधी)
अहिल्यानगर शहरातील रेसिडेन्शिअल कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ
महाविद्यालयातील शिक्षक डॉ. म्हातारदेव म्हस्के यांना शिक्षक दिनानिमित्त राज्य
कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार -२०२५ जाहीर झाला आहे.शिक्षक ध्येय , मात्रवृक्ष
बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी यांच्या
संयुक्त विद्यमानाने शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक
पुरस्कारासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.म्हस्के यांच्या कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व संवाद या
उपक्रमास पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे आष्टी
तालुक्यातील आणि अहिल्या नगर शहरातील शिक्षक मित्र परिवारां कडून अभिनंदन केले जात
आहे.त्यांच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे
अध्यक्ष रा.ह.दरे, सचिव विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेश मुळे, सर्व संस्था
पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य पोकळे , उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर,
उप मुख्याध्यापिका दरे ,पर्यवेक्षिका दारकुंडे सहकारी शिक्षक वृंद यांनी अभिनंदन
केले.
0 टिप्पण्या