Ticker

6/recent/ticker-posts

सहाय्यक वाहतुक निरीक्षक बबन गायकवाड यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा

आष्टी (प्रतिनिधी) नियतवयोमाना नुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील सहाय्यक वाहतुक निरीक्षक बबन गणपत गायकवाड यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. कडा येथील प्रविण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. या सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान आ. सुरेश धस हे भुषविणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ. बाळासाहेब आजबे, माजी आ.साहेबराव दरेकर यांची असणार आहे. या सेवापुर्ती सोहळ्यास नातेवाईक,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामधील अधिकारी, कर्मचारी नातेवाईक,आपेष्ट, मित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बबन गायकवाड व समस्त गायकवाड परिवार यांनी केले आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य,मित्र परिवार व रापमंचे कर्मचारी आष्टी आगार हे उपस्थित राहाणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या